जय श्री राम
नितीन दादांना साष्टांग नमस्कार.
दोन दिवसांपूर्वी इंदिराजींच्या share ने दादांनी मला माझ्याच एक अनुभवाची आठवण करून दिली.
नोव्हेंबर २०१८ ला मला श्री. दादांच्याच कृपेने अमेरिकेत जाण्याचा योग आला. मी २० दिवसांची सुट्टी घेऊन अमेरिकेत बहिणीकडे (पल्लवी कुलकर्णी) गेलो. मला अभिजीत (पल्लवीचा नवरा) कडून समजले की त्याच महिन्यात दादांकडे सत्संग आहे. आधीच अमेरिकेच्या ट्रीपने मी खूप आनंदात होतो आणि आता सत्संग तेसुद्धा दादांसोबत, दादांच्याच अमिरिकेतल्या घरी?! हे सगळे खूप आनंददायी होते. तेव्हा कळले नाही, कि दादाच हे सर्व काही घडवत होते. मी ७ नोव्हेंबरला अमेरिकेत पोहचलो. दादांच्या कृपेने सुट्टी मजेत गेली, मग ओढ लागली ती सत्संगाची. खूप आधी माझी अमेरिकेला पल्लवीकडे जाण्याची सुप्त इच्छा होती कि जी आज दादांमुळे शक्य होत होती. आम्ही सगळे (मी, पल्लवी, अभिजीत आणि मैथिली) २१ नोव्हेंबरला ग्रीनव्हीलला जाणयासाठी निघालो. एक दिवस आम्ही अटलांटाला मुक्काम केला. आणि २२ तारखेला ग्रीनव्हिलच्या हॉटेलमध्ये पोहचलो. तिथेच दादांची बाकी भक्तमंडळी एक एक करून जमा झाली होती.
दादांचे दर्शन ते सुद्धा त्यांच्या अमेरिकेच्या घरी मला सगळे काही स्वप्ना सारखे वाटत होते पण ते स्वप्न आज दादांनी पूर्ण केले होते या सुखद आनंदाने मन भरून आले. केवढे ते प्रेम. माझ्या साठी अशक्य वाटणारी गोष्ट दादांनी सहजच पूर्ण केली होती. ४ दिवस सत्संगाचे खूपच आनंदात गेले सत्संग कधी संपत आला समजलेच नाही. सत्संगच्या शेवट्च्या दिवशी दादांनी मला माझ्या परतीच्या प्रवासाबद्दल म्हणजे मुंबईहुन औरंगाबादला कसे जाणार विचारले. मी मुंबईला प्रचिकडे (माझी छोटी बहीण) माझी गाडी ठेवली होती. दादांनी सांगितले, "एकट्याने प्रवास करू नकोस. आपण प्रवासात थकलेलो असतो, झोप लागू शकते. एखादा ड्राइवर किंवा कोणीतरी सोबत घेऊन जा." मी लगेच हो म्हणालो. २७ तारखेच्या रात्री १२ वाजता मी मुंबईला पोहचलो. दादांनी सांगितले होते, पण ठरवले कि सकाळी थोडे उशीरा उठून आपणच गाडी घेऊन जाऊ या. आणि एवढे थकल्यासारखेसुद्धा वाटत नव्हते. घरी (मुंबईला) पोहचताच प्राचीने माझ्या बॅग्स उघडल्या. आणि मीसुद्धा पासपोर्ट बघण्यासाठी छोटी बॅग उघडली आणि मला धक्का बसला कारण त्यात पासपोर्ट नव्हता. मी सगळीकडे शोधले. मोठ्या दोन्ही बॅग पूर्णपणे रिकाम्या करून बघितल्या. प्राची आणि पुष्पाकाकू (पल्लवीची आई) दोघीनीसुद्धा खूप शोधलं पण पासपोर्ट काही मिळाला नाही. यात २ एक तास गेले. मग नितीनदादांनी माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली - त्यांनी दिलेली आज्ञा (जे कि माझ्याच हिताचे होते) मी न पाळायचे ठरविले होते. चूक लक्षात येताच मी दादांना प्रार्थना केली, "दादा मी चुकलो, माझी चूक मला समजली. मी संध्याकाळी औरंगाबादला सोबत ड्राइवर घेऊन जाईल किंवा बसने जाईल. पण please माझा पासपोर्ट मला शोधून द्या." असे म्हणून मी पुन्हा छोट्या बॅग मध्ये पासपोर्ट शोधायला लागलो तर, चमत्कार! मी ज्या ठिकाणी पासपोर्ट ठेवला होता तिथेच तो सापडला. मी मनापासून दादांची माफी मागितली आणि त्यांना Thank you म्हणालो. आणि दादांच्याच कृपेने मी सुखरूप औरंगाबादला पोहचलो. दादांनी सांगितले ते माझ्या हिताचेच होते, कारण मुंबई ते औरंगाबाद प्रवासात मला १ ते १.५ तास कधी झोप लागली होती ते कळलेच नव्हते.
Thank you very much दादा सदैव तुम्ही आमच्या सोबत आहात आणि याची वेळोवेळी तुम्ही जाणीवही करून देता. आज्ञापालन चोख होईल असं नामही करवून घ्या.
जय श्री राम
13-06-2020 02:17 pm / POSTED BY : Girish Khot / Where the Experience took place : America - Mumbai - Aurangabad