।। सद्गुरूनाथ महाराज की जय ।।
आज एक वर्ष पूर्ण झाले मिसेसच्या (प्रणिताच्या) छोट्या बहिणीच्या मिस्टरांचा दुचाकीचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. आमच्यासाठी हा खूप धक्कादायक, दुःखद आणि असह्य असा प्रसंग होता.
अंत्यविधीचे सर्व सोपसकार आटोपून आम्ही परत औरंगाबादला आल्यावर दादांना मॅसेज लिहून कळवले. दादांनी लगेच रिप्लाय दिला की "परिस्थिती कठीण आहे पण अश्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी श्रीमहाराजांएवढे कोणीही सक्षम नाही." असे सांगून आम्हा सर्वांना जास्तीत जास्त नामात राहण्यास सांगितले.
पण प्रणिता मात्र रात्रंदिवस छोट्या बहिणीचाच विचार आणि काळजी करायची आणि या काळजीतूनच तिचे शारीरिक आणि मानसिक स्वस्थ बिघडले आणि माझ्या कुटुंबावार फार मोठा आणि कठीण प्रसंग ओढवला गेला.
दादाच आपल्याला या प्रसंगातून बाहेर काढतील म्हणून त्यांच्या भेटीचा ध्यास तिने धरला. मी दादांना तसें लिहून कळवले पण तेंव्हा कोविडची साथ जोरात सुरु होती आणि दादाही खूप बिझी होते म्हणून तेही शक्य नव्हते आणि दादांनी आम्हाला तसें लिहूनही कळवले की मी सध्या बिझी आहे आणि कोविडमुळे तुम्ही न आलेले बरे तुम्ही नामात राहा श्रीमहाराज सांभाळून घेतील.
नंतर एक दिवस दादांनी पहाटे ५:०० वाजता स्वतः फोन करून आम्हाला समजावून सांगितले, वेळात वेळ काढून आणि वेळोवेळी मॅसेज लिहून मार्गदर्शन केले. मी प्रणिताला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर 'डॉक्टर काय म्हणतात मला लिहून पाठव' असे म्हणून त्याबाबत ही आम्हाला मार्गदर्शन केले आणि आज एक वर्ष्यानंतर आम्ही दादांच्या कृपेनें या कठीण प्रसंगातून बाहेर पडलो आहोत.
दादा तुम्ही वेळात वेळ काढून आमचे कॉल स्वीकारले, आम्हाला कॉल करून, सत्संगातून, मॅसेज लिहून वेळोवेळी मार्गदर्शन केले ही आमच्यासाठी खूप मोठी कृपा होती, दादा तुम्हीच आम्हाला या कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकला असता आणि काढलेही.
अश्या प्रसंगात सुद्धा आमच्याकडून नाम करवून घेतले, नमावरची श्रद्धा ढळू दिली नाही उलट त्याबद्दलचे प्रेम वाढवले हिसुद्धा तुमचीच कृपा.
दादा हा प्रसंग आमच्यावर येण्याच्या अगोदरचा जो सत्संग झाला होता त्यामध्ये तुम्ही संतांबबतचे उदाहरणं दिले होते की, संसारात संत लोक दुःख मागतात, प्रपंच्यात थोडे बरे चालले की 'बाबारे, विसरलास की काय' असे भगवंताला विचारतात. आणि दुःख मागतात कारण त्यातून येणारे स्मरण हे खूप कळकळीचे असते असे उदाहरणं देऊन नंतर तुम्ही असा प्रसंग पाठवला की वाटले अरे दादांचे आपल्याकडे लक्ष आहे ही सुद्धा तुमची कृपाच.
दादा तुम्ही केलेल्या कृपेचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत.
आम्हा सर्वांकडून मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हा सर्वांना सतत नामात आणि सतत तुमच्या अनुसंधानात राहू द्या हीच तुमच्या चरणी नम्र प्रार्थना करतो.
आपले कृपाभिलाषी,
विनय भागवत,
प्रणिता भागवत,
सिद्धी भागवत,
चैतन्य भागवत.
ll जय श्रीराम ll
ll श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय ll
11-10-2021 12:27 am / POSTED BY : Vinay Bhagwat / Where the Experience took place : औरंगाबाद