|| जय श्रीराम ||
१ मार्च,२०२० ला सत्संग झाल्यानंतर गोव्यात सत्संग झाला नव्हता. जेव्हा दादांनी १० मार्चला मुंबईत कळवले की ते अमेरिकेला जायचे काही काळासाठी पुढे ढकलत आहेत तेव्हा मनाला सुप्त आनंद झाला की आपल्याला दादांचा शारीरिक सहवास आणखी काही काळ मिळणार. मधुकरअण्णा आणि शकूताई राव, जे केवळ सत्संगांसाठी काही महिने अमेरिकेहून येऊन राहिले होते त्यांची अमेरिकेला परतण्याची तारीख अगदी जवळ आली होती. त्यांची आम्ही, "आता आपण खुशाल जा अमेरिकेला, मजा करा, आम्ही येथे मजा करतो." असे म्हणून प्रेमाने मस्करी केली.
पण पुढे आमच्या ताटात काय वाढून ठेवले आहे ते माहीत नव्हते. दादा रामनवमीप्रित्यर्थ गोव्याला लवकर येतील आणि आम्हाला सत्संग घडेल असा कुठेतरी विश्वास होता आणि समजा मुंबई किंवा पुण्याला जरी सत्संग झाला तरी आम्ही त्यांच्या कृपेने त्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू शकलो असतो.
पण करोनामूळे लॉकडाऊन झाले आणि सर्व अपेक्षांवर पाणी फिरले. हे सर्व दादांच्या इच्छेने घडत आहे आणि श्रवणभक्ती खूप झाली, आता स्मरणभक्ती म्हणजे कृती आपल्या हातून घडली पाहिजे असे मानून त्यासाठी दादा आपल्याला हा वेळ देत आहेत असे मनाचे समाधान करून घेतले. पण तरीही दादांना भेटायची ईच्छा तीव्र होती. लॉकडाऊन एप्रिलपर्यंत उघडेल व त्यानंतर दादा गोव्यात भेटतील असेही वाटत होते. पण तसे झाले नाही कारण लॉकडाऊनची मुदत आणखी वाढवली गेली.
पण दादांनी कृपा केली. इंडिया सत्संग ग्रुपवर व्हर्च्युअल सत्संग घोषित झाला आणि आम्ही आनंदित झालो व आमची संधी कधी येते याची वाट बघू लागलो.
मध्यंतरी आम्ही अतिउत्साह आणि प्रेमामुळे आणि गोव्यातील जास्तीतजास्त लोकांना लाभ मिळावा म्हणून व्हर्च्युअल सत्संग चांगल्याप्रकारे कसा होईल यासाठी प्रयत्न केले. गोव्यात, मुंबई आणि पुणे या महानगरांच्या तुलनेत खूप कनेक्टिव्हिटीचे इश्यू आहेत. खूप लोकांकडे स्मार्ट फोन नाही आणि असलातरी त्याचा वापर बेसिक फोन सारखा होतो व काही काही एरियात फोनला रेंजच मिळत नाही. त्यामुळे ट्रायलसाठी वेगवेगळी झूमसारखी दुसरी सॉफ्टवेअर्स वापरून पाहिली पण समाधानकारक प्रगती वाटली नाही. साधे गोवा कोअर ग्रुप सभासदांचेच प्रॉब्लेम सुटत नव्हते तर मग पूर्ण गोवा लोकांचा सत्संग आमच्याकडून कसा होईल याबद्दल मनामध्ये साहजिकच धुकधुक होती. अर्धा मे महिना ह्या ट्रायल्स मध्ये संपला पण काहीच प्रगती नव्हती.
दादांनी मग परत कृपा केली आणि त्यांनी १६ मे ला मुंबईहून सौरभ पंडित आणि भक्ती पंडित यांची सत्संगासाठी नियुक्ती केली आणि त्यांना गोव्यातील साथीदार म्हणून आणि अनुज शेटगावकर याला नेमले. सौरभने मग कोअरग्रुपसाठी एक झूम मीटिंग घेतली दादांचा निरोप कळवण्यासाठी आणि त्यामध्ये देखील इंटरनेटचे प्रॉब्लेम्स प्रकर्षाने जाणवले. पण सत्संग कसा करायचा, भाविकांचे कसे गट करायचे, मेसेज कसा पाठवायचा, लोकांचे इंटरनेटचे प्रश्न कसे सोडवायचे आणि सहभाग कसा वाढवायचा ह्या सर्व गोष्टींची रूपरेषा दादांच्या मार्गदर्शनाखाली सौरभने आखून दिली. नंतर अचानक एक आठवड्यासाठी सौरभकडून काहीच समजले नाही. नंतर कळले की ते सर्वजण झूमला पर्याय शोधत होते.
मग, सौरभने १ जूनला कळवले की दादांनी गोव्यात ४ जून आणि ५ जून ह्या दोन दिवशी लागोपाठ सत्संग घ्यायचे ठरवलं आहे आणि त्यासाठी त्याने तयारी करून झूमवर ट्रायल घ्यायची आहे.
आमचा आधीचा अनुभव बघितला तर एव्हढ्या थोड्या अवधीत दोन सत्संग होणे हे अतिशय कठीण वाटत होते. आम्ही आधी कोणालाच काहीही कळवलेले नव्हते, विभागणी केलेली नव्हती. पण दादांचा निरोप आला आणि आम्ही सगळे लगेच कामाला लागलो.
त्यांच्या कृपेने १ तारखेला आम्ही संध्याकाळी भाविकांची लीस्ट बनवली, त्यांच्याशी संपर्क केला, त्यांचे डीटेल्स घेतले, तसेच कोण येणार, कोण नाही, वगैरे माहिती मिळवली.
२ तारखेला WhatsApp वर ग्रुप्स बनवले. त्यांना सत्संगाबद्दलच्या सूचना पाठवल्या.
३ तारखेला सौरभने ट्रायल ठेवली खरी पण ३ किंवा ४ तारखेस 'निसर्ग' नावाचे वादळ महाराष्ट्राला धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज होता.
ट्रायलसाठी लोकांची उपस्थितीही कमी वाटली. लोकांना कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स खूप होते. झूम मीटिंग कशी करायची हे बरोबर माहीत नव्हते. लॉगइन केल्यावर ते कोण आहेत हे समजत नव्हते. काहींचा ऑडिओ सुरू नव्हता अगर होत नव्हता, असे बरेच प्रॉब्लेम्स होते. त्यात भर म्हणून सौरभचे इंटरनेट कनेक्शन (निसर्ग वादळामुळे) स्थिर नव्हते.
त्यामुळे दादांना विनंती करून सत्संग गुरुवार आणि शुक्रवार ऐवजी शुक्रवारी आणि शनिवारी करावेत असा पण विचार झाला. पण दादांनी सांगीतल्याप्रमाणे आधीचेच दिवस फायनल केले.
मी शुक्रवारच्या सत्संगसाठी रजिस्टर्ड होतो आणि माझी बहीण गुरुवारच्या सत्संगसाठी रजिस्टर झाली.
10-06-2020 11:24 pm / POSTED BY : SHANKAR GAJANAN KULKARNI / Where the Experience took place : ५ जुन,२०२०; नुवे, गोवा