जय श्रीराम, नमस्कार.
साधारण वीस ते एकवीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी तेव्हा अमेरिकेत होतो. तेव्हा एका मोठ्या mass गुरूंचा अनुयायी होतो, त्यांना फॉलो करायचो. तसे दोन मास गुरु जे पुढे फार famous झाले यांची सुरुवात होण्यामध्ये माझ्या भावाचे काही प्रयत्नं होते, त्यामुळे त्यांचं exposure मला थोडयाफार प्रमाणात होतं. तिसरे एक जेही पुढे खूप प्रसिद्ध झाले ते तर माझ्या रूम mate चे सख्खे मामा होते. पण तरीही मी फार अध्यात्मिक कल असलेला होतो असे नाही.
Beyond Science (विज्ञानाच्या
पलीकडे)
पण त्या वेळी
एक प्रश्न मनात असायचा, जो मी एकदा असाच देवाला टाकला.
खरंच काही जर
असेल जे beyond science असेल तर ते मला बघायचे आहे (If
there is something beyond Science I need to see that)?.
हा प्रश्न मी
देवाला टाकला आणि तसा डोक्यातून निघून गेला.
त्या दरम्यान
सामंतमावशीला (नितीनदादाची आई) देवाज्ञा झाली, ती त्या वेळेस USA
मध्ये नितीनदादाकडे होती. माझ्या आईने भारतातून हे मला फोनवर
सांगितले. मी विचारले मग, जाऊन भेटून येऊ का मी?
तशी पूर्वी इंदिरा वहिनी आणि आईची पत्र एकमेकांना गेलेली
आणि त्यामुळे ती व छोटा विक्रम, याची थोडी कल्पना मला होती. वहिनी व विक्रमला मी फोटोमध्ये बघितलेले,
आणि नितीनदादाला बघून तर अनेक वर्षे गेली होती.
मी आधी फोनवर त्यांच्याशी बोललो, मग भेटायला गेलो. मी पोहोचलो, drive करून आत वळताना बाहेरच बसलेला नितीनदादा मला अजूनही आठवतो, ऑफ white ड्रेस घातलेला, बरोबर विक्रमही होता. मला शांतपणे बघत, मी गाडी आत वळवताना, शांत intently बघत असणारा त्याचा चेहरा.
मला थोडासा देव
हा विषय काढायची सवयच होती, थोडीशी गुरुप्रचार करण्यामुळे,
पण तशीही होती. जेवण झाले आणि बसलो.
“तुला देवामध्ये इंटरेस्ट आहे का?” मी नितीनदादाला विचारले.
"आहे थोडा फार" तो म्हणाला, मग पुढे बोलण्यात “हो, आहेत थोडेफार अनुभव देवाचे." असे बोलला. मग मीच आधी खूप वेळ बोलत होतो, नितीनदादा जास्त करून ऐकत होता.
देवाबाबतीत
आणखी एक प्रश्न मला नेहमी असायचा. "की खरंच असं
कोणी आहे का जो माझ्या मना मध्ये काय चाललंय, हे
जाणतो". म्हणजेच जो माझी व्यथा मी न सांगता जाणतो.
हा प्रश्न
नितीनदादाला विचारल्यावर त्यांनी तो टाळला, “अरे,
आपल्या स्वतःच्यातच इतके काही असते की त्यामुळे दुसऱ्याच्या मनातलं जाणून काय करायचेय".
मला माझी व्यथा
जाणतो असा देव आहे का, हे नीट मांडता आले नाही,
पण नितीनदादाला ते समजले असावे,
त्यांनी याचे indirect उत्तर
पुढे दिले.
पण देवाचे
अनुभव, माया काय आहे, यावरून बोलणे पुढे
गेले. तो मला म्हणाला, “महाराजांच्या कृपेने मला सगळीकडेच देव
दिसतो पण खरं म्हटलं तर सांगताच येणार नाही काय दिसतं ते व कोण बघतो ते.”
मग लिविंग,
नॉन-लिविंग, यात काय फरक,
वगैरे...मी त्याला
विचारत गेलो. नितीनदादाने हात पुढे केला, आणि तेथे एक
फुल प्रगटले, त्यांने ते स्वतःच्या
कपाळाला लावून नमस्कार केला आणि मला दिले (तो महाराजांना
धन्यवाद देत होता, असं मला आता वाटते).
हवेतून अचानक
फुल आले याचे मला थोडे आश्चर्य वाटले, मी ते घेतले,
त्याचा वास घेऊन बघितला. नितीनदादा हसला,
त्यालाही ती गम्मत वाटली असेल. मी काय करू असे प्रश्नार्थक
नजरेने विचारले, आणि त्याने इशारा केला त्याप्रमाणे ते
फुल समोरच्या गणपतीच्या मूर्तीला वाहिले.
हे कसे काय असे
मी विचारले. तो म्हणाला, “सगळीकडेच तो (देव/महाराज) आहे,
त्याने फक्त आकार बदलला.” नितीनदादाने स्पष्टीकरण दिले,
आणि परत मला आणखी एक फुल दिले !
खरं त्यातले एक
तरी फुल मी स्वतःजवळ ठेवायला हवे होते, पण ते तेव्हा
सुचले नाही, मी तेही फुल गणपतीला वाहून टाकले.
नितीनदादाच्या
बरोबर झालेलं बरंच काही आहे, त्या गणपती
मूर्तीचे घडलेले अनुभव, आणखी जे अलौकिक असे अनुभव,
ते इंदिरावहिनीने आणि पुढे प्रेमाआत्याने (नितीनदादाची
आत्या) सांगितले.
नितीनदादाने त्याच्या
साधनेच्या phase विषयी थोडे सांगितले,
ते ऐकुन खूपच आश्चर्य वाटले, एव्हढा
प्रयत्न मानव शरीरातून होतोच कसा असे वाटले. यातून आपणही प्रयत्न करून त्या
प्रयत्नांच्या boundaries वाढवत जाऊ शकतो
असे वाटले.
पण मी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मला मिळालं होते; Beyond Science म्हणजे विज्ञाना पलीकडचे काही तरी आहे.
आजच्या युगात काय शक्य, काय अशक्य हे माणूस आधीच ठरवून बसतो, rather आपले शिक्षण, आपला समाज ते ठरवतो. "अरे असे कधी होते का?" असे सांगणारे खूप भेटतात. त्या सगळ्या कहाण्या होत्या, वगैरे आणि वेगळा 'विचार' येणे किंवा 'विश्वास' हे त्यांच्या चौकटीत बसत नाही. अरे एवढा शिकलेला तू आणि हे काय. यातून मुख्य नुकसान हे कि आपण प्रयत्नच करत नाही, जप करणे, ध्यान करणे, मूर्ती पूजा करणे, हे "fashionable" नसते. आणि ते केले तरी आपण त्यावर बंधने (limits) घालतो. आपल्या किंवा rather आपल्याला शिकवलेल्या "Science" च्या चौकटीत ते बसते का याचा आधार शोधतो. मनात कधी उभा राहिलेला भाव /भक्ती आपण बाजूला सारतो, त्यात झोकून जाता येत नाही आपल्याला. कदाचित लोक आपल्याला वेडे म्हणतील ही भीती असते.
दुसऱ्या
प्रश्नाचे उत्तर ही दिले गेले होते पण ते मला (अजूनही) नीटसे कळले नव्हतं. पण मला
माझ्या पहिल्या प्रश्नाचे (विज्ञाना पलीकडे) उत्तर
मिळाले यातच हे स्पष्ट होते कि कोणीतरी होते/आहे जे माझी व्यथा जाणत होतं.
ते सर्वव्यापी होते का, माहित नव्हते,
तो नितीनदादाच होता का हे हि माहित नव्हते. पण ते कोणीतरी
मला नितीनदादाकडे घेऊन गेले होते.
नितीनदादा ही
काही गोष्टी जाणतो हे स्पष्ट होते. त्याला पाया पडायला गेलो तर कधी कधी
राहू दे नको असे म्हणायचा आणि कधी जेव्हा माझ्या मनातला भाव बदलला असेल तेव्हा म्हणायचा
की ठीक आहे.
पण यातून आणखी एक गोष्ट होती. आपण काय शक्य आणि अशक्य असे ठरवतो, त्याच्या पलीकडे काही बघायला मिळाले होते, आणि त्याहीपेक्षा मोठी म्हणजे मला उपयोगी पडेल अशी गोष्ट झाली होती. नितीनदादाने त्याच्या साधनेच्या काळाबद्दल सांगितले होते, वर म्हटल्या प्रमाणे. आणि त्याहीपेक्षा मनाला आशा देणारा असा नितीनदादाच्या वडिलांच्या पारमार्थिक प्रवासातील गोष्टी त्याने सांगितल्या होत्या. ती गोष्ट तर मी भारावल्यासारखी खूप लोकांना नंतर सांगितली. त्याच्यावरून हे निःसंशय दिसत होतं की पैसा, तब्येत (म्हणजे शारीरिक स्वास्थ्य) हे ही साधकाला साधन करायला, आनंद किंवा शांती मिळायला आवश्यक नव्हते. आणि सांगितलेला मार्ग हा करण्याजोगा होता. जप आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी जप करू शकतो, आणि तेही एव्हढा मोठ्या प्रमाणावर, तेही नास्तिक अवस्थेमधुन सुरु करून, हे खूपच प्रोत्साहन देणारे होते.
म्हणजे आपणहि करू शकू, थोडाफार का असेना. यात आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे नितीनदादाचे सगळे बोलणे हे प्रोत्साहन देणारे होते, हे कर, हे करू शकतो, असे दर्शवणारे होते. कुठेही नितीनदादा कोणी वेगळा आणि अवतारी आहे म्हणून त्याला जमले असे काही claim करणारे नव्हते.
मग मी परत घरी जाताना गाडी चालवता चालवता ही भरपूर मंत्र जप केला, तेव्हा तर त्या इतर गुरूंचा मंत्र म्हणायचो, जो गायत्री मंत्र वगैरे सारखा मोठा ११ शब्दांचा वगैरे होता. पण पोहोच दिली तसे नितीनदादाला सांगितले, की मी ड्राईव्ह करता करता जप केला. तेव्हा “अरे वा...” तोही खुश होऊन म्हणाला.
छोट्या गोष्टीतून सांगून जाणे
छोट्या
गोष्टीमधून नितीनदादा काही परमार्थ सांगून जायचा हे आता कळते. विक्रम आणि मी टेबल टेनिस
खेळायचो दादा ऑफिसला गेला की, घरी आल्यावर कधी
नितीनदादाही खेळायचा. विक्रमचे काही टीव्ही गेम्स होते,
तेही मी खेळायचो, मग एकदा मी
विक्रमची काही बुक्स वाचायला बसलो होतो.
विक्रमनी garage
ला कान लावून,
नितीनदादा येतोय असे मला सांगितले.
नितीनदादा आत आला
आणि मला बघून आश्चर्याने विचारले, "अरे, तू खरंच
ही पुस्तके वाचणार आहेस?"
‘त्यापेक्षा साधना कर’ असे तो सांगत होता, पण ते तेव्हा कळले नाही.
वागण्यात सहजता
पुढे आई अप्पा
(माझे आई-वडील) अमेरिकेला आले, नंदाकाका-प्रफुलमावशी
(गायतोंडे दांपत्य), प्रेमाआत्या,
माझा एक अध्यात्मिक मित्र अश्विन. आम्हा सर्वांची त्या काळात खूप वेळा नितीनदादाची भेट
झाली.
प्रत्येकाशी
नितीनदादा त्यांच्याप्रमाणे आणि तितकाच सहज वागायचा. आई अप्पा यांना अध्यात्मिक रस
नव्हता असे नाही, पण त्या वेळी आमची मुलांची काळजी खूप किंवा नंदाकाकाना science,
मग त्या कलाने, नितीनदादा सहज
बोलायचा.
वर म्हटले तसे छोट्या विक्रमची गोष्टीची पुस्तके वाचताना साधना कर असे सावध केले तसे त्याने अश्विनशी बोलतानाहि त्याला काही सांगितले. अश्विनला त्या वेळी काही अनुभव येत होते. पण साधना करत राहा, नाहीतर हळू हळू ते अनुभव गायब होऊ लागतील असे नितीन दादाने त्याला एक उदाहरण देऊन सावध केले.
आश्विन त्याच्या रूम mates चे उद्योग सांगत होता तेव्हा, साधना करत असताना 'संगत', सहवास कोणाची, मित्र मंडळी काय कृत्य करतात त्यात आपण फक्त साक्षी म्हणून जरी असलो तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि याला खूप महत्व असते. महाराज म्हणतात तसे संगतीचा फार मोठा परिणाम आपल्यावर होतो. साधकाने साधन करताना काय टाळावे किंवा सोडून द्यावे लागते, ह्याबाबतीतही त्याने अश्विनला सावध केले.
सेवा
यात इंदिरावाहिनीलाही धन्यवाद देणे गरजेचे आहे. त्याकाळी मी चित्र विचित्र diets follow करत असायचो, बरेचदा त्यांच्याकडे late ही पोहोचायचो. ती एक शब्दही यावरून कधी बोलायची नाही. तसे तिचे आणि मा
Jai SriRam 🙏
With SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA's Grace there will be regular Satsangs at Sri Maharaj's Hall,
On every Saturday, starting From 19th Nov 2022
Address :
Draupadi Apts,
Above Bike Cafe
Navelim
South Goa,
Pin code-403707
Location :- https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9
Schedule of the Satsang
~4:00 pm - Puja
~4:15 pm to 4:45 pm - Aarati
~4:45 pm to 5:45 pm --Chant
~5:45pm to 5:50 pm Pravachan reading.
Satsang will conclude with Pravachan reading
For details contact-
Sneha Govekar-
+91-7218386163
ETIQUETTES TO BE FOLLOWED AT THE SATSANG
It is our Faith that SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA are present at the Satsang. So, to show our utmost respect to SRI MAHARAJ and our SatGuru SRI NITIN DADA,
all are requested to follow the instructions given below.
1. Reach the venue before the given time, so that other devotees are not disturbed in their Practices.
2. Please do not get up and go while the Spiritual Practices are going on.
3. Refrain from small talks and other conversations during the entire duration of the Satsang. Try to be in Naam all the time.
4. MOBILE SHOULD BE SWITCHED OFF OR KEPT ON SILENT MODE.
5. Please follow the Satsang sevaites instructions.
Jai SriRam 🙏
जय श्रीराम
🙏
श्रीमहाराज व सद्गुरू श्रीनितीन दादा यांचे कृपेने, श्रीमहाराज सत्संग हॉल,
येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासून, पुढील प्रत्येक शनिवारी सत्संग नियमितपणे सुरू होत आहेत.
पत्ता :
द्रौपदी अपार्टमेंट्स,
नावेली,
गोवा, ४०३७०७.
स्थळ :-https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9
सत्संगाची रूपरेषा
संध्याकाळी ४:०० वा - पूजा
~४:१५ - ४:४५ - आरती
~४:४५ - ५:४५ - नाम संकीर्तन
~५:४५ - ५:५० -- प्रवचन वाचन
प्रवचन वाचनाने सत्संगाची सांगता होईल
अधिक माहितीसाठी संपर्क
स्नेहा गोवेकर
+91-7218386163
सत्संगाचे नियम-
सत्संग होतो तेव्हा श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा प्रत्यक्ष समोर बसलेले असतात, ही आमची भावना आहे, तर श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा यांच्याप्रती अत्युच्च आदर म्हणून आपण सर्वांनी खालील सूचना पाळूया
१ . सत्संगासाठी सर्वांनी वेळेवर यावे, जेणे करून, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही.
२. कृपया सत्संग सुरू असताना मध्येच उठून जाऊ नये.
३. मोबाईल बंद ठेवावा. कॉल घेऊ नयेत.
४. सर्व प्रकारच्या प्रापंचिक गप्पा टाळून फक्त नामात राहावे.
५. कृपया सत्संग सेवेकऱ्यांच्या सूचना पाळा
जय श्रीराम
🙏
Jai SriRam 🙏
Naam Japa/Chanting Satsang on Saturday, 25th May 2024
With the grace of SriMaharaj and our beloved Satguru Sri NitinDada, we are pleased to announce Naam Japa/ Chanting Satsang for a continuous duration of approx. 8 hours; on Saturday, 25th May, 2024.
Venue:-
Sri Maharaj's Hall,
Draupadi Building, Sirvodem,
Margao, Goa.
The Schedule of the Satsang:
Puja:- 8.45 am to 9.00 am
Aarti:- 9.00 am to 9.30 am
Naam Japa/ Chanting:- 9.30 am to 5.30 pm. ( 8 hours continuous)
After this there will be a pravachan reading and Spiritual discussion / Shares session followed by dinner prasad.
1. There is a provision for Breakfast with Tea Prasad, Lunch Prasad, Afternoon tea Prasad , and Dinner prasad for all of the
Devotees present during Satsang.
2. The Hall is fully air-conditioned, Devotees may carry a shawl, sweater, etc. if they feel necessary.
3. Devotees can come for the Satsang anytime as per their convenience but are requested to ensure that while entering and leaving the Satsang Hall, other devotees' sadhana is not disturbed.
4.You may bring your own Japamala if you feel it necessary.
Special notice:-
SriNitinDada may or may not be physically present in the Satsang
Jai SriRam 🙏
जय श्रीराम
🙏
नाम जप/संकीर्तन सत्संग
आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,
श्रीब्रम्हचैत्यन्य महाराज
आणि आमचे प्रिय सद्गुरु
श्रीनितीनदादायांच्या कृपेने
शनिवार, दिनांक २५ मे, २०२४ रोजी सलग आठ तासासाठी नामजप/संकीर्तन सत्संग आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ:
श्रीमहाराजांचे सभागृह,
द्रौपदी बिल्डिंग, शिरवडे
- मडगाव, गोवा
सत्संगाचे वेळापत्रक:-
पूजा : - सकाळी ८. ४५ - ९.००
आरती :- सकाळी ९.०० - ९.३०
नाम जप/ संकीर्तन:- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३०
त्यानंतर, प्रवचनवाचन होईल आणि पारमार्थिक चर्चा आणि श्रीमहाराजांच्या कृपेचे शेअर्स सांगितले जातील. शेवटी रात्रीचा भोजन प्रसाद दिला जाईल.
१ . या दिवशी सकाळचा नाश्ता आणि चहा प्रसाद, दुपारचा भोजन प्रसाद, त्यानंतर संध्याकाळी चहा प्रसाद आणि रात्रीचा जेवण प्रसाद यांचं सर्व उपस्थित भाविकांसाठी आयोजन केलेलं आहे.
२. हॉल पूर्णपणे वातानुकूलित आहे. भाविकांना विनंती आहे की गरज भासल्यास आपली शाल,स्वेटर इ. त्यांनी सोबत आणावी.
३. भाविक कोणत्याही सोयीस्कर वेळी सत्संगात सामील होऊ शकतात. फक्त सत्संगहॉलमध्ये येताना किंवा जाताना, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
४. आपणास आवश्यक भासल्यास आपली जपमाळ सोबत घेऊन यावी.
विशेष सूचना:-
सत्संगात श्रीनितीनदादा हे प्रत्यक्ष हजर असतीलच असे नाही.
जय श्रीराम
🙏
JAI SRIRAM
🙏
Would you like to receive browser notifications from this website?
🙏
JAI SRIRAM