जय श्रीराम
जेव्हा २०१८ मधे बाॅलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचे निधन झाले त्या दिवशी माझे मन खुप बेचैन हाेते.काल पर्यंत असणारा माणुस आज अचानकच नाहीसा हाेताे.एक प्रकार ची विचित्र भिती वाटत हाेती.मध्यरात्र झाली तरीही झाेप लागत नव्हती.ताेच वॉटस् ऐप वर एक काॅल आला.नंबर अनाेळखी हाेता पण इंडियातील नंबर असल्याने मी ताे काॅल घेतला.पण समाेरून कुणीच बाेलले नाही.मी विचार केला की सकाळी बघुयात.नंतर लगेच मला झाेप लागली.
सकाळी मी अमाेलला(नवरा)सांगितले की रात्री कुणाचा काॅल हाेता ते बघताेस का..त्या ने सगळे गृप चेक केले अन् काय आश्चर्य ताे काॅल नितीन दादांच्या शेअर्स ॲाफ हिज ग्रेस या गृप मधून आला हाेता.दादांनी पुन्हा एकदा त्यांची कृपा व त्यांची साेबत या घटनेने दाखवून दिली.
त्यानंतर एप्रिल २०१८ ला न्यूयाॅर्क येथील सत्संग मधे मी दादांना वरील प्रसंग शेअर केला.
त्या वर दादा बाेलले की,यावरून आपल्याला समजले ना की आयुष्य किती अशाश्वत आहें.मग वेळ का घालवायचा.लगेचच जाेमाने नाम घ्यायला सुरूवात करायला हवी.कारण नाम च एक आहे की जे शाश्वत आहे.
एवढया सहज आणि साेप्या शब्दांत माझ्या नितीन दादांनी मला नामाचे महत्व पटवून दिले.
धन्यवाद नितीन दादा.
जय श्रीराम
04-06-2020 02:01 am / POSTED BY : Prajakta Deshpande / Where the Experience took place : न्यूजर्सी अमेरिका