।।जय श्रीराम।।
सद्गुरू नितीनदादांच्या चरणी साष्टांग नमस्कार, काही दिवसांपूर्वी माझ्या मनात आले की आपल्याकडे महाराजांच्या प्रवाचनांचे पुस्तक हवे, परंतू ते कोठे मिळेल? नंतर विचार केला जेव्हा आपण गोंदवले येथे जाऊ तेंव्हा नक्की घेऊयात. सध्या मोबाईल अप्लिकेशन आहेच. त्यानंतर आम्ही गौरी गणपतीसाठी आमच्या गावी बीड येथे आलो. तेंव्हा माझी मिसेस सौ. योगिनी हिच्या मावशीकडे गेलो असता, (दिनांक 11 सप्टेंबर 2021) बऱ्याच गप्पा टप्पा झाल्या, निघताना मावशीचे मिस्टर श्री. पांडुरंग काकांनी विचारले तुमच्याकडे श्री. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवाचनांचे पुस्तक आहे का ? आम्ही 'नाही' म्हणालो, ते म्हणाले, "मी देतो तुम्हाला, मी दहा प्रती आणल्या आहेत". त्यांनी आम्हाला एक प्रत दिली. जेंव्हा ती प्रत मी घेतली तेंव्हा मला खूप सुगंध जाणवला. अशा प्रकारे माझ्या मनातील इच्छा सद्गुरुंच्या कृपाआशीर्वादाने पूर्ण झाली.
।।जय श्रीराम।।
13-09-2021 10:49 pm / POSTED BY : Pravin Kale / Where the Experience took place : बीड( महाराष्ट्र)