IIजय श्रीराम II
II श्रीसदगुरुनाथ महाराज की जय II
श्रीनितीनदादांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार.
दादा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्रीमहाराजच आहेत हे आज दादांनी अनुभवातून दाखवून दिले.
आज सकाळी माझ्या मॅनेजरने मला काही मटेरियल एका पार्सल ऑफिसमध्ये आले का असे विचारून डोअर डिलिव्हरी असेल तर त्यांना मटेरियल द्यायला सांग असे सांगितले, मी त्यांच्या समोर पार्सल ऑफिसला फोन केला तर त्यांनी सांगितले की मटेरियल आलेले आहे आम्ही दुपारपर्यंत पाठवतो.
दुपारपर्यंत मटेरियल आले नाही म्हणून मॅनेजरने मटेरियल अर्जेन्ट आहे, त्यांना मटेरियलची गरज आहे त्यामुळे तू स्वतः जाऊन घेऊन ये असे सांगितले
मी गेटपास घेऊन निघालो नेहमीप्रमाणे गेट च्या बाहेर पडल्यावर "सद्गुरूनाथ महाराज की जय" म्हणून गाडी सुरु केली आणि दादांच्या कृपेनें नाम सुरु केले.थोडे अंतर चालून गेल्यावर दादांच्या चरणाची आठवण आली, आधी आनंद झाला मग भावुक झालो मग डोळ्यांमधून जे अश्रू सुरु झाले कितीतरी वेळ सुरूच होते, दादांची खूप तीव्रतेने आठवण येत होती, त्यांची जाणीव होत होती.
पार्सल ऑफिसला पोहोचलो तर सेक्युरिटी गार्डने सांगितले की पार्सल ऑफिस दुसरीकडे शिफ्ट झाले, त्याला नवीन ऑफिसचा address विचारला,गाडी आणि दादांच्या कृपेनें नाम सुरु करून निघालो, एक कार समोरून जात होती, सहज लक्ष गेले पाठीमागच्या ग्लास वर "ब्रह्मचैतन्य"असे लिहिलेले होते.
एकदम खुश झालो, आनंद झाला, दादांची आठवण काढली आणि दादा त्या रूपाने समोर आले होते, मनापासून दादांना धन्यवाद दिले आणि दादांनी परत नामाला लावले.
या अगोदर सुद्धा दादांनी त्यांच्या कृपेनें असा अनुभव दोन तीन वेळा दिला होता एका वेळी "सामंत दादा प्रसन्न"असे दाखवले, दुसऱ्या वेळी "सामंत दादा" असे आणि मागील महिन्यात तर "दादांची कृपा"असे लिहिलेले गाड्यांचे ग्लास दाखवून दादा सोबत असल्याच्या प्रत्यय दिला होता यावेळी मात्र "ब्रह्मचैतन्य"असे दाखवले. म्हणजे मी आणि महाराज वेगळे नाही आहोत असेच ते होते.
चमत्कार म्हणजे मी जे मटेरियल आणले ते मॅनेजरला लागले पण नाही, त्यांना जेंव्हा मटेरियल आणले म्हणून सांगितले तर ते म्हणाले माझे काम झाले आता सध्या स्टोरमध्ये ठेऊन दे.
अगोदर मला माझा वेळ फुकट घालवला म्हणून राग आला पण नंतर त्या माध्यमाला (मॅनेजरला) मनापासून धन्यवाद दिले.
त्याला निमित्त करून दादांनी मला खूप छान आणि अविस्मरणीय अनुभव दिला आणि हे निदर्शनास आणून दिले की वेळ फुकट नाही तर खरा सत्कारणी लागला होता.
दादा खूप गोड़, आणि अविस्मरणीय अनुभव दिला त्याद्वारे तुमचे दर्शन आणि उपस्थिती दाखवून दिली त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद.
Thank You दादा.
दादा सतत रामनामात आणि तुमच्या अनुसंधानात राहू द्या हीच तुमच्या चरणी नम्र प्रार्थना.
आपला कृपाभिलाषी,
विनय भागवत.
II श्री सद्गुरूनाथ महाराज की जय II
09-09-2021 11:02 pm / POSTED BY : Vinay Bhagwat / Where the Experience took place : औरंगाबाद.