साधकांने सत्संगात विचारलेल्या प्रश्र्नावर पू. नितीनदादांनी दिलेल्या उत्तरावर आधारीत.
"कोणी बोललं कि राग का येतो?"
जय श्रीराम
जेंव्हा आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडते तेंव्हा राग येतो. महाराज म्हणतात की राग हे अभिमानाचं पहिलं व्यक्त रूप / प्रतीक आहे. जेथे आपण राग दाखवू शकत नाही तेथे दुःख होतं आणि जेथे काहीच करता येत नाही तेथे निराशा / उद्विग्नता (Frustration) येते.
पण जीवनात मनाविरुद्ध गोष्टी ह्या घडणारच. मग काय करावं? राग कसा आवरावा? एक उपाय म्हणजे स्वतःला सांगावं की 'महाराजांनी ही गोष्ट घडवली आणि महाराज माझ्या भल्याचच करतात. माझं अहित कधीच करणार नाहीत.’
दुसरं म्हणजे नुसतं रागावून मनाविरुद्ध गोष्टी घडायच्या थांबत तर नाहीतच पण आपण मात्र स्वतःला त्रास करवून घेतो.
महाराज देहात असताना शेवटच्या दोन दिवसात त्यांना काकासाहेब फडक्यांनी विचारलं, 'चांगले साधनी लोक असतात, परमार्थात खूप पुढे गेलेले, तरी अशांनाही साधन करताना त्यांच्या साधनात अडथळे येतात. हे अडथळे कोण आणतो?' महाराज म्हणाले, 'ते अडथळे मीच आणतो. पण जो रामनाम घेईल त्याच्या मागे राम उभा राहील आणि तो ते अडथळे दूर करील'. आपण जरा खोल विचार केला तर असं दिसतं की जो अडथळे तयार करू शकतो तोच ते बाजूलाही काढू शकतो. म्हणजेच महाराज आणि राम एकच, नाही का?
दुसरा येऊन माझ्या मनाला लागेल असं बोलला कि मला राग येतो, वाईट वाटतं. का बरं? कारण बोलणारासुद्धा महाराजांचंच रूप आहे हे लक्षात येत नाही. तो बोलून माझी मनःशांती काढणारा, अडथळे आणणारा, महाराजंच आहेत हे समजत नाही आणि त्याचबरोबर श्रीमहाराजांनी सांगितलेलं 'जो रामनाम घेईल त्याच्यामागे राम उभा राहील व तो ते अडथळे दूर करील' हे ही आपण विसरतो आणि स्वतःला त्रास करवून घेतो.
जर मला आधीच समजलं असेल की महाराजांनीच त्याला पाठवलं आहे, तेच आणि तसंच बोलायला सांगितलं आहे तर मी काय उत्तर देईन त्याला? किंवा मी स्वतःला काय समजावेन की ‘महाराज मला ह्यात काहीतरी शिकवत असावेत’. असाच सात्त्विक विचार आपली मनात येईल ना?
मग आपण स्वतःहून तसा विचार का करू नये मग राग शांत व्हायला लागतो. पण तसं होत नाही. राग आला कि माणूस बरेचदा सारासार विचारच करू शकत नाही. शेवटच्या क्षणात रामनाम घेईन असे आपण म्हणतो पण मायासुद्धा तेवढीच प्रबळ आहे व आपले षड्विकार तिच्या अधीन असल्याने आपण बरेचदा रागाच्या बळी पडतो. सगळं झाल्यावर लक्षात येतं की खरं तर मला रागवायची गरजच नव्हती. म्हणून आधीपासून रामनाम घेत असावं.
हल्लीच्या व्यावहारिक तत्वज्ञानात (Philosophy) काय सांगतात, ‘राग आला तर लगेच उत्तर देऊ नये’, ‘रागांमध्ये निर्णय घेऊ नका’, ‘दहा मिनिटांनी भेटू’, ‘दहा पर्यंत किंवा शंभर पर्यंत आकडे मनात मोजा’ वगैरे. पण अशाने राग जाईलच असं सांगता येत नाही कारण ते १० अंक मोजतांना मन मात्र झालेल्या गोष्टीवरच स्थिरावलेलं राहतं आणि १० अंक मोजून झाले तरी राग जात नाही उलट कधीकधी तो जास्त उफाळून बाहेर येतो.
उलट पक्षी आपण नेहमीच नाम घेत गेलात तर, जेंव्हा तुम्हाला गरज लागेल त्यावेळी ऑलरेडी तुमच्याकडे नामाचा साठा असेल. त्यातून ते रामनामाचं शांत पाणी मनावर शिंपडलं जातं आणि राग शांत होतो कारण नाम ही अशी एकंच चीज आहे जी मनाला व्यापून राहू शकते.आज आमच्याकडे ते पाणीच नाही मग (मनाच्या) कोरड्या विहिरीत रागाची वाफ उफाळून वर येणारंच; म्हणून सतत नाम घ्यावं असं महाराज वारंवार सांगत. राग आल्यावर मग मी नाम घेईन म्हटलं तर तसं नाम घेणं नेहमी शक्य होत नाही वा खूप कठीण जातं. म्हणून आतापासूनच नामाचं हेल्मेट घालून फिरलं पाहिजे.
महाराज आणखी वेगळ्या प्रकारे असं म्हणतात की 'नाम खालपर्यंत जातं आणि मायीक विचारांना हुसकावून लावतं. मग ते विचार वर पृष्ठभागी / सरफेसवर (आपल्याला जाणवतील त्या लेव्हलवर) येतात. म्हणून नाम घेत असतांना ते आपल्याला जाणवतात. वाईट विचार आपल्या आतमध्ये आहेत घट्ट झालेल्या गाळासारखे (like a hard sediment) पण ते वरती जाणवत नाहीत. चिखल जसा नदीच्या तळाशी जाऊन बसला की कालांतराने घट्ट होतो पण वरचं पाणी स्वच्छ, शांतपणे वाहतांना दिसतं, तसंच आपला अनंत जन्मांचा प्रवास आहे; जीवन सतत वाहत आहे. ह्या प्रवासात कळत, नकळत घडलेल्या गोष्टींमुळे झालेले संस्कार म्हणजेच हे वाईट विचार आतमध्ये राहून राहून घट्ट झाले आहेत. सततच्या नामाने आपण त्यांच्यावर मारा करत राहिलो तर त्या गाळाचे तुकडे तुकडे होऊन जातील व तो विरून जाईल. ह्या सर्वाचा अर्थ असा की जर नाम जन्मोजन्मीचा गाळ नाहीसा करतं तर हा वरवरचा तात्पुरत्या परिस्थितीने आलेला राग शांत करू शकणार नाही का?
म्हणून नाम सतत (थोडा वेळ नव्हे) घ्यावे ही महाराजांची आज्ञा आहे; . आम्ही प्रापंचिक लोक तसं (सतत नाम घेणे) करणार नाही / करू शकणार नाही ह्याची सुद्धा पूर्ण कल्पना त्यांना असल्याने त्यांनी ‘जेवढा रिकामा वेळ मिळेल तेवढा नामात घालवावा’ असेही सांगितले आहे.
आपण सुज्ञ आहोत खरं काय केलं पाहिजे हे जाणून त्याप्रमाणे वागणं हे आपल्यालाच करायचं आहे; महाराज पदोपदी मदत करायला आहेतच.
जय श्रीराम
Jai SriRam 🙏
With SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA's Grace there will be regular Satsangs at Sri Maharaj's Hall,
On every Saturday, starting From 19th Nov 2022
Address :
Draupadi Apts,
Above Bike Cafe
Navelim
South Goa,
Pin code-403707
Location :- https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9
Schedule of the Satsang
~4:00 pm - Puja
~4:15 pm to 4:45 pm - Aarati
~4:45 pm to 5:45 pm --Chant
~5:45pm to 5:50 pm Pravachan reading.
Satsang will conclude with Pravachan reading
For details contact-
Sneha Govekar-
+91-7218386163
ETIQUETTES TO BE FOLLOWED AT THE SATSANG
It is our Faith that SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA are present at the Satsang. So, to show our utmost respect to SRI MAHARAJ and our SatGuru SRI NITIN DADA,
all are requested to follow the instructions given below.
1. Reach the venue before the given time, so that other devotees are not disturbed in their Practices.
2. Please do not get up and go while the Spiritual Practices are going on.
3. Refrain from small talks and other conversations during the entire duration of the Satsang. Try to be in Naam all the time.
4. MOBILE SHOULD BE SWITCHED OFF OR KEPT ON SILENT MODE.
5. Please follow the Satsang sevaites instructions.
Jai SriRam 🙏
जय श्रीराम
🙏
श्रीमहाराज व सद्गुरू श्रीनितीन दादा यांचे कृपेने, श्रीमहाराज सत्संग हॉल,
येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासून, पुढील प्रत्येक शनिवारी सत्संग नियमितपणे सुरू होत आहेत.
पत्ता :
द्रौपदी अपार्टमेंट्स,
नावेली,
गोवा, ४०३७०७.
स्थळ :-https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9
सत्संगाची रूपरेषा
संध्याकाळी ४:०० वा - पूजा
~४:१५ - ४:४५ - आरती
~४:४५ - ५:४५ - नाम संकीर्तन
~५:४५ - ५:५० -- प्रवचन वाचन
प्रवचन वाचनाने सत्संगाची सांगता होईल
अधिक माहितीसाठी संपर्क
स्नेहा गोवेकर
+91-7218386163
सत्संगाचे नियम-
सत्संग होतो तेव्हा श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा प्रत्यक्ष समोर बसलेले असतात, ही आमची भावना आहे, तर श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा यांच्याप्रती अत्युच्च आदर म्हणून आपण सर्वांनी खालील सूचना पाळूया
१ . सत्संगासाठी सर्वांनी वेळेवर यावे, जेणे करून, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही.
२. कृपया सत्संग सुरू असताना मध्येच उठून जाऊ नये.
३. मोबाईल बंद ठेवावा. कॉल घेऊ नयेत.
४. सर्व प्रकारच्या प्रापंचिक गप्पा टाळून फक्त नामात राहावे.
५. कृपया सत्संग सेवेकऱ्यांच्या सूचना पाळा
जय श्रीराम
🙏
Jai SriRam 🙏
Naam Japa/Chanting Satsang on Saturday, 25th May 2024
With the grace of SriMaharaj and our beloved Satguru Sri NitinDada, we are pleased to announce Naam Japa/ Chanting Satsang for a continuous duration of approx. 8 hours; on Saturday, 25th May, 2024.
Venue:-
Sri Maharaj's Hall,
Draupadi Building, Sirvodem,
Margao, Goa.
The Schedule of the Satsang:
Puja:- 8.45 am to 9.00 am
Aarti:- 9.00 am to 9.30 am
Naam Japa/ Chanting:- 9.30 am to 5.30 pm. ( 8 hours continuous)
After this there will be a pravachan reading and Spiritual discussion / Shares session followed by dinner prasad.
1. There is a provision for Breakfast with Tea Prasad, Lunch Prasad, Afternoon tea Prasad , and Dinner prasad for all of the
Devotees present during Satsang.
2. The Hall is fully air-conditioned, Devotees may carry a shawl, sweater, etc. if they feel necessary.
3. Devotees can come for the Satsang anytime as per their convenience but are requested to ensure that while entering and leaving the Satsang Hall, other devotees' sadhana is not disturbed.
4.You may bring your own Japamala if you feel it necessary.
Special notice:-
SriNitinDada may or may not be physically present in the Satsang
Jai SriRam 🙏
जय श्रीराम
🙏
नाम जप/संकीर्तन सत्संग
आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,
श्रीब्रम्हचैत्यन्य महाराज
आणि आमचे प्रिय सद्गुरु
श्रीनितीनदादायांच्या कृपेने
शनिवार, दिनांक २५ मे, २०२४ रोजी सलग आठ तासासाठी नामजप/संकीर्तन सत्संग आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ:
श्रीमहाराजांचे सभागृह,
द्रौपदी बिल्डिंग, शिरवडे
- मडगाव, गोवा
सत्संगाचे वेळापत्रक:-
पूजा : - सकाळी ८. ४५ - ९.००
आरती :- सकाळी ९.०० - ९.३०
नाम जप/ संकीर्तन:- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३०
त्यानंतर, प्रवचनवाचन होईल आणि पारमार्थिक चर्चा आणि श्रीमहाराजांच्या कृपेचे शेअर्स सांगितले जातील. शेवटी रात्रीचा भोजन प्रसाद दिला जाईल.
१ . या दिवशी सकाळचा नाश्ता आणि चहा प्रसाद, दुपारचा भोजन प्रसाद, त्यानंतर संध्याकाळी चहा प्रसाद आणि रात्रीचा जेवण प्रसाद यांचं सर्व उपस्थित भाविकांसाठी आयोजन केलेलं आहे.
२. हॉल पूर्णपणे वातानुकूलित आहे. भाविकांना विनंती आहे की गरज भासल्यास आपली शाल,स्वेटर इ. त्यांनी सोबत आणावी.
३. भाविक कोणत्याही सोयीस्कर वेळी सत्संगात सामील होऊ शकतात. फक्त सत्संगहॉलमध्ये येताना किंवा जाताना, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
४. आपणास आवश्यक भासल्यास आपली जपमाळ सोबत घेऊन यावी.
विशेष सूचना:-
सत्संगात श्रीनितीनदादा हे प्रत्यक्ष हजर असतीलच असे नाही.
जय श्रीराम
🙏
JAI SRIRAM
🙏
Would you like to receive browser notifications from this website?
🙏
JAI SRIRAM