साधकांने सत्संगात विचारलेल्या प्रश्र्नावर पू. नितीनदादांनी दिलेल्या उत्तरावर आधारीत.
कुत्र्यासारखे लोळत पडणे
जय श्रीराम
आपण साधक, साध्य साधायचं आहे तर आपल्याला कुत्र्यासारखंच असावं लागतं, नामाच्या/महाराजांच्या बाबतीत.
कुत्रा जसा कुठेही असेल तरी त्याचे कान/लक्ष सगळं मालकावर असतं तसं आपण संसारात कुठेही असलो तरी मनाने लक्ष नामावर/महाराजांवर सतत असलं पाहिजे (सतत अनुसंधान/नामस्मरण).
मालक चांगला असेल तर कुत्र्याची मजा चालते; त्याची चांगली काळजी घेतली जाते, त्याला चांगलं खायला वगैरे मिळतं पण समजा जर मालक खराब निघाला तर त्याचे फार हाल होतात तरी कुत्रा मात्र मालकाला ईमानी राहतो.
तसं आपणही आपलं नशीब चांगलं अथवा खराब असेल तरी आपण महाराजांना ईमानी राहू. म्हणजेच अखंड त्यांच्या स्मरणात राहू व ते आपल्यावर खूश होतील असेच वागू. दुसरा भाग म्हणजे प्रारब्ध जर खराब असेल तर त्याचा कोणालाही दोष न देता हे महाराजांनीच मला दिले आहे व ते माझे भोग संपवत आहेत यामध्ये आम्ही आनंद मानू.
पण हेच वाक्य महाराजांच्या बाजूने पाहिलं तर असं दिसतं की महाराजांचं उलटं आहे असं ते सांगत आहेत. आपल्याला समजवायला ते असं म्हणत आहेत की त्या नामाला मी एवढा भुलतो की मी कुत्र्यासारखा (त्या नामावरती अर्थात) जो ते घेतो त्याच्यावरती अखंड लक्ष ठेऊन असतो.
अखंड भगवन्नाम ही एकच गोष्ट आहे की जिच्यावर महाराज स्वतः फिदा होतात/असतात. अखंड नाम घेणारा मालक व ते स्वतः त्याचे रक्षणकर्ते (कुत्रा) होतात.
त्यामुळेच ते म्हणत की माझ्या मनात माझा 'बुवा (ब्रह्मानंद महाराज)' असतो कारण त्याच्या मनात माझ्याशिवाय कोणीच नाही.
जय श्रीराम
23-12-2020 09:29 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : Place - १२/०५/२०२० - झूम सत्संग, मुंबई