जय श्रीराम
प्रसंग क्र. १
मी कंपनीच्या कामानिमित्ताने अमेरिकेला गेलो होतो. कामाची जवाबदारी खुप मोठी होती आणि खरे सांगायचे तर थोडा टेन्शनमध्ये पण होतो. दादांना स्मरून मी पहिल्या दिवशी ब्रेकफास्ट करून कॅबची वाट बघत साईडवॉकवर उभा होतो. तेवढयात माझे लक्षं त्या साईडवॉकच्या कोपऱ्यावर गेले. तेथे काँक्रीट वर कोरले होते "साई राम, जय मातादी". अमेरीके सारख्या देशात आणि त्यातल्या त्यात कॅलिफोर्निया सारख्या राज्यात जिथे लोकं चंगळ, मौज करायला जातात तिथे मला दादांनी श्री रामांचे नाम दाखवले.
ह्या सर्व घटनेतून दादा नेहमीच सोबत असतात हे दिसून आलं, पण ते सोबत आहेत हे न समजण्यातच माझी चुक होत असते हे ही कळलं.
प्रसंग क्र. २
याच ट्रिप मध्ये मला अनुक्रमे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि त्या नंतर लंडन, इंग्लंड अशा निरनिराळ्या ठिकाणी जायचे होते. मी कॅलिफोर्निया वरून न्यूयॉर्कला आलो आणि क्लायंटने कळविले कि कोवीड-१९ मुळे ट्रॅव्हल करायला मनाई आहे आणि आहे त्या ठिकाणी राहा व कामे पूर्ण करून भारतात परत जा. दादांची इच्छा म्हणून मी कामाला सुरवात केली आणि नंतर कळले कि मी ज्या ज्या ऑफिसेस मध्ये जाणार होतो आणि जाऊ शकलो नाही तिथे कोवीड-१९ च्या केसेस होत्या.
मी न्यूयॉर्कमध्ये ३ आठवडे होतो आणि त्यावेळेस तेथे ५०००+ कॉरोनच्या केसेस असताना देखील मी सुखरूप होतो.
मी कितीही टेन्शन घेतले तरी कंट्रोल दादांचाच असतो. जे होईल ते त्यांचाच मर्जीने होईल आणि ते माझ्या पारमार्थिक भल्यासाठीच असेल.
परदेशात माझ्या सोबत हे घडत असताना गोव्याला सत्संग होता आणि दादांनी पुजाला (माझी पत्नी) विचारले की "अंकुर कधी येतोय परत?" त्यावर पुजा म्हणाली की "कोवीड मुळे सांगता येत नाही, ट्रॅव्हल प्लॅन बदलू शकतो." त्यावर दादा म्हणाले की "लवकर आला तर चांगलंच आहे." आणि बरोबर सत्संगाच्या नियोजित तारखेच्या ३ दिवस आधी भारतात सुखरूप परतलो. महत्वाचे म्हणजे मी भारतात परतल्यावर काही दिवसांनीच इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद झाल्या.
ह्या घटनेमध्ये त्यांच्याच कृपेने एक जाणवले की गुरु इतके प्रेम कोणीही देवू शकत नाही व गुरूंइतकी आपली काळजी पण कोणाला असू शकत नाही. माझ्या गुरुसारखा पाठीराखा असताना मला कशाचीच काळजी करायची गरज नाही.
जय श्रीराम
06-09-2020 01:56 am / POSTED BY : Ankur kulkarni / Where the Experience took place : Woodland Hills (CA), NYC (NY), USA