जय श्री राम
नमस्कार
पूर्व कथित प्रसंगात संकटेही श्री महाराजच आणतात, असा उल्लेख केला. तसेच माझे भूत, वर्तमान व भविष्यही तेच घडवितात असेही म्हटले. भूतकाळ व वर्तमानकाळाची सांगड घालुन भविष्यासाठीची पूर्व तयारीही तेच कशी करवुन घेतात ह्याचा थोडा खुलासा करायचा प्रयत्न करते.
वरील प्रसंगासाठी श्री महाराजांनी करवुन घेतलेली पूर्व तयारी अशी:
Insurance company: जुनमध्ये दुसऱ्या गाडीची बॅटरी down करवुन त्यानिमित्ताने insurance company ला फोन करुन road side assistance मध्ये कीती, काय व कसे covered आहे ह्याची माहीती महाराजांनी आधीच मिळवून दीली होती.
Donut (spare tire): कामावरील सहकारी एक-दीड आठवड्यांपूर्वीच “You shouldn’t drive the car faster than 50-55 mph, if you have a donut on it.” अशी चर्चा करीत होते. मला काही समजेना की donut गाडीवर ठेवुन ही लोकं गाडी का चालवणार? तेव्हा spare tire घातल्यावर घ्यायची काळजीही महाराजांनी आधीच सांगुन ठेवली होती.
ह्यात अजुन एक गोष्ट सांगायची म्हणजे, used car विकताना डीलर्स बऱ्याचदा spare tire काढुन घेतात असेही ऐकले होते. गाडी घेतल्यावंतर दोन-तीन आठवड्यानंतर एकदा “चुकुन” डीकी उघडी राहीली. धो धो पाऊस पडत होता. आतील Liner ओला झाला म्हणुन काढला तोच त्याच्या खाली असलेला spare tire, jack वगैरे महाराजांनी दाखवून ठेवला होता.
Secondhand गाडी घेतली त्यावेळेस त्या गाडीला brand new tires आहेत हे त्या dealer ला सुद्धा माहीत नव्हते. त्या salesmanला सुद्धा विकताना लक्षात आले होते.
श्री महाराजांचे देणे पण कसे भरभरून असते, ना? गाडी Second hand, पण आतुन तसेच बाहेरुनही बघितली तर नवीन कोऱ्या गाडीसारखीच दीसते.
हे पूर्व तयारीचे कनेक्शनही श्री महाराजांनी कीती सुंदररीत्या लक्षात आणुन दीले ह्याबद्दल त्यांचे आभार मानते.
Thank you Nitindada for everything!
जय श्री राम
24-08-2020 07:05 am / POSTED BY : Aparna Walawalkar / Where the Experience took place : कनेक्टीकट, अमेरिका