जय श्री राम
नमस्कार
२६ जुलैच्या
सत्संगातील नितीनदादाचे एक वाक्य मनाला भिडले.
“संकटेही श्रीमहाराजच आणवितात. ते
नाकारणे म्हणजे false modesty आहे.”
विचार करता
जाणवले की श्रीमहाराजच जर खरे कर्ता करविता आहेत हा द्रुढ विश्वास असेल तर मग
संकटेही तेच आणणार, नाही का?
जेव्हा कधी
कुठलीही कठीण परिस्थिती येते तेव्हा सुरुवातीलाच श्रीमहाराजांचे स्मरण न होता
मनावरील ताबा सुटतो.
पण जर श्रीमहाराजच
सर्व करतात व ते सतत माझ्या बरोबर असतात हा भरवसा सातत्याने बाळगला तर श्रीमहाराज
मनावरही ताबा मिळवून देणारच!
ह्याचा प्रत्यय श्रीमहाराजांनी
दोन दीवसांतच दीला.
मंगळवारी जुलै
२८ ला मी कामावरून घरी येत होते. घरासाठीचा exit घेतला, तोच टायर मधुन कसला तरी आवाज येत
असल्याचे जाणवले. घरी गाडी पार्क करुन अडकलेले खेचून काढताच क्षणी फस् करुन आवाज
आला. टायरची हवा निघत असल्याची ती खूण होती. Fantastic! परंतु
त्यामुळे exact जागा समज़ुन
पटकन फोटो काढला गेला. श्रीमहाराजांची आठवण आली. त्यांच्याशिवाय कोण ही कल्पना
देणार?
कामावर कळविले
की उद्या मला पोचायला उशीर होईल. एक सहकाऱ्याने सुचविले की try to get the hole plugged at a tire shop.
गाडी विकत
घेताना डीलरकडून extended coverage घेतले आहे. पण
फोन केल्यावर कळले की टायर्स त्यात कव्हर्ड नाहीत.
दुसऱ्या दिवशी
जप झाल्यावर insurance company ला फोन केला.
त्यांच्या माणसाने Spare tire (ज्याला इथे donut म्हणतात) घातला व मग
कामावर गेले.
येताना tire shop जे घराच्या आदल्या exit वर अगदी लगेचच आहे. तिकडे गेले.
Front desk वरील
माणुस अगदी friendly व विनोदी होता, श्री महाराजच ते! अख्खा दीवस काम करुन
दमले होते ना मग करमणुकीसाठी अशी माणसे भेटवितात.
त्या माणसाने टायर
तपासले व मला म्हणतो की looks like its a new tire, it will cost
you around $6.35. मला वाटले की हा मस्करी करत आहे. पण आत गेले
तर रिसीट फक्त $६.३३!
पहिलं म्हणजे ते फिक्स करू शकले आणि दुसरं म्हणजे एवढ्या स्वस्तात!! जय श्री राम!
जे काही घडत
होते त्याची फार गंमत वाटत होती.
मला आदल्या दिवशीच्या
संध्याकाळपासुन श्रीमहाराज कसे माझ्या बरोबर आहेत त्याचा पुन्हा एकदा first hand अनुभव येत होता.
मी मनोमन म्हटले
की महाराज तुम्ही काय मजा करत आहात! श्रीमहाराजांचा मिश्किलपणे हसणारा चेहेरा परत
परत डोळ्यांसमोर येत होता.
असेही मनात आले
की महाराज आता पुढे अजुन काय प्लान? बाहेरुन
बघतां टायरचा problem
वगैरे होता पण मनोमन श्रीमहाराज बरोबर असल्याची काही औरच
मजा वाटत होती.
दुसऱ्या दिवशी
कामावर जाताना व घरी परतताना ABS-break lights आलेले
दीसले.
पुन्हा श्रीमहाराजांना
म्हटले व मनाला समजावले की आपण बघु काय ते, महाराज
आहेत बरोबर! तेच तर सर्व करीत आहेत.
मस्तपैकी जो
काही चॅंट होता तो ऐकत होते. काही मैलांनंतर लक्ष गेले, तर lights
गुल!!
हसु आवरतां
आवरेना!
आठवत नाही की
कधी मला कोणी इतकी Special treatment दीली असेल.
२६ तारखेच्या
सत्संगात नितीनदादाकडून अजुन एक शिकायला मिळाले होते.
“माझ्या गुरुंनी माझ्यासाठी इतका वेळ
द्यावा, इतके करावे.
कीती हे माझे भाग्य!” खरंच काय मजा
केली ते फक्त श्रीमहाराजांनाच माहीती आहे.
माझ्या सोबत ते किती
सातत्याने असतात ह्याची त्यांनी जाणीव करवुन दीली.
अतिशय
महत्त्वाचे म्हणजे ह्यावेळेस मनाला गुद्दे मारुन शहाणपणा करायच्या फंदात न पडायला
देता, गुपचुप त्याचे स्मरण ठेवायला जी मदत श्रीमहाराजांनी
केली त्या बद्द्ल त्यांचे आभार तरी कसे मानु?
श्रीमहाराजांना
माझे भूत, वर्तमान व भविष्य माहीती आहे. “मी” फार
फार तर त्यांचे सतत स्मरण ठेउन, त्यांच्याच
मदतीने मनाला वळण लावण्याचा प्रयत्न मात्र करु शकते.
इकडे मला
प्रचिती आली की जे काही होते ते फक्त श्री महाराजांच्याच ईच्छेने होते व ते माझ्या
भल्याकरीताच होते.
मग “false modesty” चा प्रश्नच
उद्भवणार नाही.
Thank you
Nitindada for everything!
जय श्री राम
24-08-2020 06:59 am / POSTED BY : Aparna Walawalkar / Where the Experience took place : कनेक्टीकट, अमेरिका