ll जय श्री राम ll
वेळ साधारण रात्रीच्या ९ ची. स्वारी आज खुश होती. लग्नाचा वाढदिवस होता. वाढदिवसाची गिफ्ट म्हणून माझ्याकडून व सोहमकडून (माझा मुलगा) दादांनी मस्त पनीर शाही बिर्याणी करून घेतली होती. जेवण पटकन उरकून मी देशमुख सरांकडे जायला निघालोच होतो, तेवढ्यात मला माझ्या MD चा मेसेज आला. घरातून बाहेर पडताना मेसेज चेक केला - व्हॉट्सऍप वर फोटो आला होता आणि खाली लिहिले होते - Here Infini enters Oman. इन्फिनि इन्स्टिटूट, पुणे आणि ओमान मधील टॅलेंट इन्स्टिटयूटचा २ वर्षांचा करार झालेल्याचा तो फोटो होता ज्यासाठी मागील ३.५ ते ४ वर्ष मी, माझे MD आणि इतर काही कार्यकतें आम्ही ह्यासाठी प्रयत्नशील होतो. सगळे उपाय करून झाले होते. अजून काय करावे सुचत नव्हते. इंटरनॅशनल मार्केट चांगलं असताना काही घडलं नव्हतं, त्यामुळे ह्या कोविड पॅनडेमिकमध्ये काही फ्रुटफुल घडेल अशी आशा नव्हती. पण शेवटी महाराज आणि आपले दादाच ते. सगळी परिस्थिती आमच्या दृष्टीने विपरीत असताना, ओमान गव्हर्नमेंट आर्थिक मंदीतून जात असताना हे दादांनी आज लीलया घडवून आणले होते. सगळी चक्र मागील महिन्याभरात फिरली आणि आज करारावर सह्या करवून घेतल्या. का बरे आजच्याच दिवशी हे घडावे? - मी स्वतःलाच परत परत हा प्रश्न विचारत होतो.
नऊ महिन्यांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर २०१९ ला दादांनी मला नाम दिले होते. आणि आज इन्फिनि इन्स्टिटयूट च्या शिरपेचात एक सुंदर तुरा लावला होता. ह्यातून महाराजांनी माझ्यावरील जबाबदारी वाढवून दिली आणि माझ्यावर भरोसा टाकला असेच मला वाटले. नामाचीच करामत ! दादा म्हणतात तसे आलेला एक अनुभवसुद्धा आपल्यासाठी श्रद्धा दृढ करायला पुरेसा असतो. हा अनुभव तर माझ्यासाठी स्वप्नवत असा आहे. मला लग्नाच्या वाढदिवसाची गिफ्ट दादांनी दिली असं मला वाटतंय. महाराजांचं किती जबरदस्त प्लॅनिंग असेल ते दादांनाच माहित!
दादा म्हणतात ना - जे करायचं असेल ते आपली इच्छा म्हणून सुरुवात करावी, पूर्ण प्रयत्न करावा, जे घडेल ते त्याच्या (महाराजांच्या / रामाच्या) इच्छेने घडेल. महाराजांच्याकडे आल्यावर टेन्शन जायची असतात, टिकत असतील किंवा वाढत असतील तर चुकतंय काहीतरी ह्याचा प्रत्यय पण दादांनी दिला. ३-४ वर्षांपासूनच टेन्शन चुटकीशी गायब केलं.
कमाल आहे, बुद्धीच्या बाहेरच आहे, योगायोग मात्र नक्कीच नाही हे तितकेच खरे. नाम आणि अनुसंधान वाढत राहो हीच दादांच्या चरणी इच्छा.
ll जय श्री राम ll
06-08-2020 01:09 am / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, ५ ऑगस्ट २०२०