II सद्गुरूनाथ महाराज की जय II
जानेवारी 2020 चा अनुभव आहे. पुण्याला दादांच्या मावशीकडे (प्रफुल्लमावशी)सत्संग होता.
मी आदल्या दिवशी उपस्थितीचा मॅसेज केला आणि पुण्याला सत्संगासाठी निघालो.
मॅसेज केल्यानंतर पुण्याला येतो आहे असे अभिजीत (माझा मित्र) सोबत बोलणे झाले तर तो म्हणाला की त्याला दादांकडे एक तास अगोदर सत्संगाच्या तयारीसाठी जावे लागते (दादांनीच त्याला ही सेवा दिली होती) तुला मात्र दिलेल्या वेळेवरच यावे लागेल, मी ठीक आहे असे म्हणालो.
माझीपण सत्संगासाठी सेवा करण्याची इच्छा होती, बसमध्ये बसल्यावर मी दादांना सेवा मिळण्याच्या संदर्भात मॅसेज लिहिला. दादांचा मला लगेच फोन आला किती वाजता निघालास? कुठपर्यंत पाहोचलास असे विचारून दादांनी तू अभिजीतसोबत येऊन सेवेमध्ये भाग घे असे सांगून सेवेची संधी दिली. दादांना मनापासून धन्यवाद दिले आणि पुण्याला पोहोचल्यावर एक तास अगोदर जाऊन सत्संगाच्या तयारीची सेवा दादांनी करून घेतली. (दादांनी सेवा करण्याची एक ईच्छा पूर्ण केली होती)
सत्संगाची सेवा पूर्ण होईपर्यंत दादा आतील खोलीमध्ये होते. सत्संग सुरु होण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर दादांनी हॉलमध्ये प्रवेश केला.
माझे लक्ष दादांच्या पायाकडे होते दादा त्यादिवशी सॉक्स न घालताच आले होते, दादांनी माझी दुसरी इच्छा पूर्ण केली होती. (मला असे वाटत होते की दादा सॉक्स न घालता आले तर त्यांचे चरण डोळे भरून बघता येईल, सॉक्स असल्यावर चरण दिसत नाही म्हणून.)
अजून एक ईच्छा अशी होती की दादांच्या चरणाजवळ बसायला मिळावे की जेणेकरून दादांचे चरण डोळेभरून बघता येतील आणि मनामध्ये साठवून घेता येतील.
त्या दिवशी जवळ जवळ बासष्ट ते पाशष्ट चा काउन्ट होता. मी महाराजांच्या तस्विरीजवळ उभा होतो. एक एक साधक येऊन दादांना नमस्कार करून बसू लागले, माझे सगळे लक्ष दादांच्या जवळ असलेल्या जागेवर होते की तिथे कुणी बसू नये की जेणेकरून त्या जागेवर मला बसता येईल.
बरेच साधक आल्यावर दादा मला म्हणाले की "अरे तू उभा का आहेस ये बैस, तू उभा राहिलास की माझे पाय दुखतात."
असे म्हणून त्यांनी मला त्यांच्या चरणाजवळ बसवून घेतले.आणि हळूच वाकून हसून म्हणाले "आता ठीक आहे ना?"
नंतर काय सगळे मला पाहिजे तसेच मिळाले होते डोळ्यांसमोर दादांचे चरण, कानांवर दादांचा गोड़ आणि सुमधुर आवाज आणि मुखामध्ये दादांचे नाम हे मिळाल्यामुळे मी भारावून गेलो होतो.
एक तास नामसंकीर्तन, प्रवचन, निरूपण आणि नंतर साधकांची प्रश्ने दोन ते तीन तास छान गेले, असे वाटत होते की हे संपूच नये.
त्यादिवशी दादांचे चरण डोळ्यामध्ये इतके साठवून ठेवले की कधीही दादांना नमस्कार करतांना आठवले की दादांच्या कृपेनें ते चरण जसेच्या तसें डोळ्यासमोर येतात. मनातील पारमार्थिक ईच्छा पूर्ण होण्याचा हा पारमार्थिक अनुभव मी कधीही विसरणार नाही.
निघतांना जेव्हा दादांना नमस्कार केला, दादा म्हणाले "झाले सगळे मनासारखे?"
मनापासून दादांना धन्यवाद दिले.
"मनातील पारमार्थिक ईच्छा दादा पूर्ण करतात." असे या अनुभवातून मला शिकायला मिळाले.
II सद्गुरूनाथ महाराज की जय II
20-07-2020 10:46 pm / POSTED BY : Vinay Bhagwat / Where the Experience took place : पुणे