II सद्गुरूनाथ महाराज की जय II
दादांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार.
दादांनी मला पहिले दर्शन दिले ते २००५ मध्ये पुण्याला प्रेमा आत्यांकडे (दादांच्या आत्या).
दादांनी दिलेल्या वेळेवर मी आत्यांकडे पोहोचलो, दारावरची बेल वाजवली मीनाताईंच्या मिस्टरांनी दरवाजा उघडला मी ओळख सांगितली आणि दादांनीच बोलावले म्हणून सांगितल्यावर ते म्हणाले आम्ही सर्वजण चॅन्ट करत आहोत तुम्हाला चॅन्ट करायला आवडेल का? चॅन्ट हा काय प्रकार आहे हे मला तोपर्यंय माहित नव्हता. मी हो म्हटले आणि घरात प्रवेश केला, आतील रूममध्ये सर्वजण मिळून सीडी प्लेयरवर चॅन्ट करत होते.
माझे डोळे दादांना शोधत होते. दादा बेडवर बसलेले दिसलें आणि त्यांना बघून मला खूप आनंद झाला. दादांच्या हातात एक पेला होता त्यामध्ये तीर्थ आणि मंजुळ होती.
माझ्या मित्राने (अभिजीत) सांगितले अगदी तसेच गोरेपान, तेजःपुंज आणि अगदी साधे राहणारे.
दादांनी माझ्याकडे बघून स्मित हास्य केले आणि खुणावून बसायला सांगितले.ते स्मित हास्य असे होते की जणू आम्ही एकमेकांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो.(दादा मला केंव्हापासून ओळखतात हे मला सांगणे कठीण आहे)
५० मिनिटांची चॅन्ट संपली, दादांनी सर्वांना तीर्थ दिले आणि सर्वजण हॉलमध्ये येऊन बसलो. दादांना त्याचदिवशी बाहेरगावी जायचे होते म्हणून आम्ही सर्वजण त्यांना स्टेशनवर सोडून घरी परतलो.
पुढे काही दिवसांनी जेंव्हा आत्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की आपण त्या दिवशी ज्या सीडी प्लेयरवर चॅन्ट केली तो सीडी प्लेयरवर खराब झाला होता म्हणून दीड ते दोन वर्षांपासून माळ्यावर टाकला होता. चॅन्ट करण्याअगोदर नितीनदादाला सांगितले होते की तो सीडी प्लेयर चालत नाहीये तर ते म्हणाले, "असा कसा बंद आहे आपण बघूया चॅन्ट करण्यासाठी कसा सुरु होत नाही."
असे म्हणून सुरु केला आणि काय चमत्कार तो व्यवस्थितरीत्या सुरु झाला. गंम्मत म्हणजे दुसऱ्या दिवसापासून पुन्हा बंद झाला तो अजूनपर्यंत बंदच आहे. आम्हा सर्वांसाठी हा चमत्कारच होता.
मला तर दादांनी पहिल्या भेटीतच (या जन्माच्या) चमत्कार दाखवला होता. पण दादा नेहमी म्हणतात तसें चमत्काराकडे लक्ष न देता आम्हा सर्वांकडून खूप छान चॅन्ट करवून घेतली हेच महत्वाचे.
दादांनी असेच सतत नामसंकीर्तन करवून घ्यावे हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना.
II सद्गुरूनाथ महाराज की जय II
18-07-2020 09:46 pm / POSTED BY : Vinay Bhagwat / Where the Experience took place : पुणे