जय श्रीराम
मी व माझे पती वैभव दादांना भेटायला पुण्याला ३ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी गेलो होतो. आमच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शन मिळाल्यावर आम्हाला घरातल्या घरातच दादांच्या बरोबर चँटिंग, प्रवचन व त्यांच्या निरुपणाचा आनंद मिळाला.
बोलताना दादा सांगत होते, "जिथे नाम आहे अशी आपली श्रद्धा आहे, तिथे नामाच्या शक्तीचा परिणाम जाणवतो. व देहाची दुःख वाटत नाहीत."
मी दादांना सांगत होते 'मला शेंगदाण्याची प्रचंड ऍलर्जी आहे. आत्ता इथे आल्यावर जो त्रास चालू झाला, त्याच्यावरून इथे शेंगदाण्याचं काही चालू आहे हा अंदाज आला. मी आपल्या इथे असल्यामुळे काही होणार नाही, अशी मला खात्री होती. मी घरी असते तर आत्तापर्यंत मारामाऱ्या होऊन, उलट्या वगैरेने अख्ख घर डिस्टर्ब झाल असतं. घरात दाणा भाजलेला जरी आला तरी अख्खी संध्याकाळ, अख्खा दिवस झोपून काढावा लागतो. पण इथे मला काहीच झालं नाही. गोंदवल्याला जेंव्हा जातो तेंव्हा प्रसादात दाण्याचं कूट असलं तरी त्रास होत नाही'.
दादा म्हणाले, "It's very vivid experience. नामाच्या शक्तीचा परिणाम phenomenal आहे. गोंदवल्याला गेल्यावर तेथे नाम आहे ही श्रद्धा आहे, इकडे नाम आहे या भावनेमध्ये आपलं कनेक्शन होतं आणि ते कनेक्शन झालं ना की त्याच्या ताकतीचा परिणाम आत मध्ये येतो. इथे नाम प्रस्थापित आहे."
११ जुलै रात्री देशमुख सरांचा मला फोन आला, त्यांनी विचारलं ३ जानेवारी पासून आजपर्यंत तुला शेंगदाण्याचा त्रास झाला का? आणि मी उत्तर दिलं 'सेंसेशन असतं पण पूर्वी सारखा त्रास एकदाही झाला नाही'. त्यांनी ३ तारखेची केलेली दादांची ऑडिओ क्लिप परत आम्हाला पाठवली व नीट ऐकायला सांगितली. आम्ही रात्री ऐकल्यावर नि:शब्द झालो. ऑडिओ मध्ये माझा प्रसंग सांगून झाल्यानंतर पुढे दहा-पंधरा मिनिटांनी नामाच्या ताकदीचा विषय परत आल्यावर दादांचे शब्द होते, "जसं तिला (मला) आज नामाची प्रचिती आली, कसली ही worst Allergy, आम्ही काढून टाकू. जेेंव्हा तुम्ही नामात असता तेंव्हा त्रासही जाणवत नाही.'
एकदम जाणवलं कि दादांचे आपल्यावर किती लक्ष आहे व कृपा आहे. पण लगेच खूप वाईट वाटलं कि इतके महिन्यात मला त्रास झाला नाही तो त्यांच्या कृपेने गेला असेल असा विचारही आला नाही.
दादा, आपल्याला शिरसाष्टांग नमस्कार. आज आपल्या कृपेची जाणीव करून दिलीत. परत असे विस्मरण न होवो व घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात आपल्या अस्तित्वाची जाणीव टिकून राहो.
एकच कृपा असावी कि आमच्याकडून खूप नामस्मरण करून घ्यावं.
जय श्रीराम
13-07-2020 06:27 am / POSTED BY : Kshiti Navare / Where the Experience took place : पुणे