जय सतगुरु जय श्रीराम
तेजसचे (माझी मुलगी) नुकतेच लग्न झाले होते आणि ती अर्नाळ्याला सासरी रहात होती. वांद्र्याला माझ्या एका मावशीकडे नितीनचा सत्संग आयोजित केला होता. तेजस व निनाद (तेजसचे मिस्टर) पुण्याला आले होते तेव्हा नितीन बरोबर फोनवर बोलणे होत होते. सत्संगाचा विषय निघाला तेव्हा तेजस म्हणाली, 'मी येऊ का?' नितीन पटकन म्हणाला, "सामंताना विचार."
नितीन अजून आम्हाला आमच्या सारखाच वाटतो. तेजस म्हणाली सामंतानाच विचारत आहे. तेव्हा नितीन म्हणाला, 'मी आता सामंत राहिलो नाही.'
तेव्हा लक्षात आले, की तिच्या नवऱ्याला म्हणजे निनाद सामंतना विचार असे नितीनचे सांगणे होते.
परमार्थात अजून खूप चालणे बाकी आहे एवढेच त्या प्रसंगाने जाणवून दिले. त्यामुळे पाऊले उचलण्याची म्हणजे नाम घेण्याची प्रेरणा मिळाली. आतापर्यंत नाम किती वाढले हे त्यालाच माहीत.
नितीन म्हणजे काय ते कसं सांगू पण त्याची आत्यंतिक कृपा की त्यामुळे आशयघन उत्तर मनात आलं. ते म्हणजे -
तो आता परमात्मा आहे आणि विशेष म्हणजे माझा सतगुरु आहे. त्याच्या प्रत्येक वाक्याला वेगळा अर्थ असतो. तो कळेपर्यंत नाम घेत शांत राहणे महत्त्वाचे असते म्हणजे मग तो आतून सुंदर रीतीने समजावून सांगतो; ते म्हणजे नितीन आता फक्त सामंत आडनावामध्ये, माझा मामेभाऊ म्हणून सीमित राहिला नाही. तो पूर्ण ब्रह्म आहे.
धन्य धन्य मी सतगुरु. तुलाच शरण आले नितीन.
जय सतगुरु जय श्रीराम
12-07-2020 07:45 pm / POSTED BY : Meena Tirodkar / Where the Experience took place : पुणे २०१४