l l जय श्री राम l l
५ जुलै २०, आज गुरुपौर्णिमा. ४२ वर्ष्यांच्या आयुष्यात आज पहिल्यांदा गुरुपौर्णिमेची वाट पाहणे झाले. एवढ्या वर्षांनी खरा गुरु जो भेटला होता आणि सद्गुरू ची ओळख झाली होती ! दादांनी सकाळीच मस्त नामस्मरण करवून घेतले. स्वारी खुश होती कारण आज गुरु चे माहात्म्य जाणवत होते. गुरुचरणी आज काय बर अर्पण करता येईल हा विचार सुरु होता. काहीतरी वेगळं ज्यांनी गुरु खरंच खुश होईल अशी गिफ्ट मी शोधत होतो. लॅपटॉप ओपन केला आणि म्हटलं चला; मागील ७-८ महिन्यांचा अनुभवच शब्दबद्ध करू. तीच भक्तीसुमने माझ्या दादांना खुश करतील, खरा आनंद देतील. महाराजांच्या प्रेरणेने लिहिलेली ही वचनवजा प्रार्थना दादांच्या चरणी अर्पण.
पाहुनी युगे वाट गुरुची, मन ते होते थकले
देऊनी दर्शन तुवा, मज इनीशिएशन जे केले..
जाणिले हात हाती धरिला, तू जन्म जन्मांतरीचा
पुशिले मागील देणे, दावूनि पथ नामस्मरणाचा..
काढुनी भय, किल्मिष भरिशी विश्वास, प्रेम अन भक्ती
बसविशी श्रीराम मनी, ही लाऊडस्पिकर सम तुझी युक्ती..
नको अढी अन नको ती चिंता, हाच तुझा कायदा
अनुसंधान श्री रामाचा, हाच दिला तुज मी वायदा..
धरिले कमल चरण तुझे, किंबहु न सुटावे आता
बेडा पार सद्गुरू करावा, तुम्हीच जाता जाता..
विषय, विकार, अहंकार सब, लाव परमार्थाच्या मार्गा
भोग भोगाया प्रपंची, मग नाही मज कोणतीच पर्वा..
तूच माय अन बापही तूच, ह्या एकल्या जीवा
बनुनी सारथी सदा, रथ हाकाय माझा तू रहा..
वाहतो मनीच तुझं फुले सुगंधी, अन चंदन, माळा
स्व घेऊनि सर्व तुझं चरणी, कर मुक्त मज जीवा..
तूच ध्यानी अन मनी तूचि, सदा सर्वदा रहा
कामात तू, श्वासात तू, हर इच्छेत तूचि हवा..
सबकुछ मायाजाल हैं, हे उमगे तुझियाच कृपा
मुझमें बसा तू ईश्वर हैं, हीच दृष्टी देगा मज देवा..
l l जय श्री राम l l
07-07-2020 07:55 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, ५ जुलै २०२०