जय श्रीराम
२ जुलैला रात्री दादांशी बोलणे झाले त्यावरून आम्हाला समजले की ते अमेरिकेला जात आहेत. अर्थात ते यावर्षी गुरु पौर्णिमेला भारतात नसणार.
अल्पना (पत्नी) दादाला म्हणाली रविवारी गुरु पौर्णिमा आहे, तू कदाचित गोव्यात येशील असे वाटत होते. त्यावर दादा म्हणाले यावर्षी पौर्णिमेचा काय प्लान आहे? मग लगेचच म्हणाले, "मला प्रसादाला काय करणार ते ऐकायचे नाही." त्यावर अल्पना म्हणाली, "आम्ही त्या दिवशी नामस्मरणावर जास्त भर देणार आहोत." त्यावर दादा उत्तरले, "आपण असा विचार करावा की आज गुरु द्वादशी आहे, उद्या गुरु त्रयोदशी, परवा गुरु चतुर्दशी आणि रविवारी गुरु पौर्णिमा. मी काय सांगतो आहे ते तुला समजले असेलच." आम्हा सर्वांना हा विचार सुखद वाटला.
दादांशी बोलणं संपल्यावर मी लगेचच ठरवले की मी त्या क्षणापासून गुरुपौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त नामात राहण्याचा प्रयत्न करणार, कारण नाम घेणे दादांना फार आवडते.
असा नाम घेण्याचा विचार मी पूर्वीही केला होता आणि तो पुढे कार्यान्वित झाला / केला नाही. हा मागील अनुभव लक्षात ठेवून मी मग असे ठरवले की काही एक लक्ष ठरवून त्या अनुषंगाने प्रयत्न करुया. म्हणून एक ‘क्ष’ जपसंख्या ठरवली जी गुरु पौर्णिमेपर्यंत पूर्ण करायला हवी होती.
ठरवलेले टार्गेट माझ्यासाठी (माझा आधीचा अनुभव पाहता) तसे कठीणच होते. माझे नाम घेण्याच्या बाबतीतील प्रयत्न आधी कधी कसोशीने झाले नव्हते. पण ह्या वेळी टार्गेट ठरवले ते पण दोन तीन दिवसांसाठी, म्हणून चिकाटीने आणि जबरदस्तीने प्रयत्न करायचा असे मी स्वतःशीच ठरवले. घरातील इतर कोणाला काही त्याबाबत सांगितले नाही.
खूप आधी, कधीतरी दादा म्हणाले होते की प्रत्येक लहानात लहान गोष्ट करत असताना देखील नाम घ्यावे. अनायासे नाम घेतल्याचे पुण्य मिळते. आपण रोज उठल्यावर, दात घासताना, आंघोळीपूर्बी, काहीही खाण्यापिण्या अगोदर, जेवण करत असताना, घराबाहेर पडण्यापूर्वी, ऑफिसला काम सुरु करण्यापूर्वी अश्या लहान प्रसंगी देखील सहज नाम घेऊ शकतो.
पण ह्या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मला जमत नव्हत्या. जेवणाच्या टेबलावर बसल्यावर, जेवण सुरू करण्यापूर्वी नाम घेतल्यानंतर लगेचच (आधीच्या माझ्या वाईट सवयीने ) माझ्याकडून काहीतरी अवांतर विषय काढले जाऊन त्यावर उगाचच संभाषण /वाद होत मग नाम घेणे तर दूरच राही.
मी आधी जो प्रयत्न केला होता, तो वरवरचा होता. जुन्या सवई मोडायला अवघड. त्यातही नाम घेणे काही माझ्या आवडीची गोष्ट नव्हती. त्यामुळे आपण जसे दरवर्षी ५ जूनला, जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने, आयते मिळालेले रोप लावतो, एक दिवस त्याला पाणी घालतो आणि मग पुढे वर्षभर त्या झाडाला विसरतो, तसे माझे व्हायचे.
त्यामुळे अनेकदा सद्गुरूंनी समजावूनही मला नाम घेण्याची आठवण / बुद्धी होत नव्हती .
मी ठरवले की यावेळी जपसंख्येचे लक्ष कुठल्याही परिस्थितीत पुरे करायचे. त्यानुसार मन लागो किंवा न लागो, प्रयत्न मात्र पूर्ण करायचे. दादांच्या फोटोला नमस्कार करून जप सुरु केला.
दादांची कृपा अशी की मी कळवले नाही तरी घरून मला जपासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळाले. मी सकाळी लवकर जपाला बसलो ते दुपारी जेवायला उठेपर्यंत नाम घेण्याचा प्रयत्न केला, कारण ठरवलेले लक्ष नाहीतर पूर्ण होणे जरा कठीणच होते.
दुपारी जेवणासाठी बसलो, पण यावेळी नामाचाच विचार मनात होता म्हणून अवांतर गप्पा झाल्या नाहीत. नाही म्हणायला अमेयने (मुलगा) काहीतरी विषय काढला होता पण अल्पनाने त्याला गप्प केले. नंतरही छोटी छोटी कामे करताना नाम घ्यायचे आठवले जे आधी मला सातत्याने जमले नव्हते. दादांच्या कृपेनें ठरवलेले लक्ष पूर्ण झाले आणि मनाला खूप बरे वाटले.
मग दादांच्या कृपेनेच एक विचार आला की आपल्याला नामासाठी ठराविक वेळ रोज दिलाच पाहिजे. नामाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान दिलेच पाहिजे. म्हणजे नित्यनियम हा पाहिजेच.
नित्यनियमाच्या जोडीला मग (जेव्हा कधी आपण प्रपंचात व्यस्त असू तेव्हा) दादा म्हणाले तसे छोट्या छोट्या गोष्टी करतानाही मग नाम घेण्याची बुद्धी होईल
दादा! माझ्याकडून ठरवलेली जप संख्या पुरी करून घेतल्याबद्दल
THANK YOU.
जय श्रीराम
Jai SriRam 🙏
With SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA's Grace there will be regular Satsangs at Sri Maharaj's Hall,
On every Saturday, starting From 19th Nov 2022
Address :
Draupadi Apts,
Above Bike Cafe
Navelim
South Goa,
Pin code-403707
Location :- https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9
Schedule of the Satsang
~4:00 pm - Puja
~4:15 pm to 4:45 pm - Aarati
~4:45 pm to 5:45 pm --Chant
~5:45pm to 5:50 pm Pravachan reading.
Satsang will conclude with Pravachan reading
For details contact-
Sneha Govekar-
+91-7218386163
ETIQUETTES TO BE FOLLOWED AT THE SATSANG
It is our Faith that SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA are present at the Satsang. So, to show our utmost respect to SRI MAHARAJ and our SatGuru SRI NITIN DADA,
all are requested to follow the instructions given below.
1. Reach the venue before the given time, so that other devotees are not disturbed in their Practices.
2. Please do not get up and go while the Spiritual Practices are going on.
3. Refrain from small talks and other conversations during the entire duration of the Satsang. Try to be in Naam all the time.
4. MOBILE SHOULD BE SWITCHED OFF OR KEPT ON SILENT MODE.
5. Please follow the Satsang sevaites instructions.
Jai SriRam 🙏
जय श्रीराम
🙏
श्रीमहाराज व सद्गुरू श्रीनितीन दादा यांचे कृपेने, श्रीमहाराज सत्संग हॉल,
येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासून, पुढील प्रत्येक शनिवारी सत्संग नियमितपणे सुरू होत आहेत.
पत्ता :
द्रौपदी अपार्टमेंट्स,
नावेली,
गोवा, ४०३७०७.
स्थळ :-https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9
सत्संगाची रूपरेषा
संध्याकाळी ४:०० वा - पूजा
~४:१५ - ४:४५ - आरती
~४:४५ - ५:४५ - नाम संकीर्तन
~५:४५ - ५:५० -- प्रवचन वाचन
प्रवचन वाचनाने सत्संगाची सांगता होईल
अधिक माहितीसाठी संपर्क
स्नेहा गोवेकर
+91-7218386163
सत्संगाचे नियम-
सत्संग होतो तेव्हा श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा प्रत्यक्ष समोर बसलेले असतात, ही आमची भावना आहे, तर श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा यांच्याप्रती अत्युच्च आदर म्हणून आपण सर्वांनी खालील सूचना पाळूया
१ . सत्संगासाठी सर्वांनी वेळेवर यावे, जेणे करून, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही.
२. कृपया सत्संग सुरू असताना मध्येच उठून जाऊ नये.
३. मोबाईल बंद ठेवावा. कॉल घेऊ नयेत.
४. सर्व प्रकारच्या प्रापंचिक गप्पा टाळून फक्त नामात राहावे.
५. कृपया सत्संग सेवेकऱ्यांच्या सूचना पाळा
जय श्रीराम
🙏
Jai SriRam 🙏
Naam Japa/Chanting Satsang on Saturday, 25th May 2024
With the grace of SriMaharaj and our beloved Satguru Sri NitinDada, we are pleased to announce Naam Japa/ Chanting Satsang for a continuous duration of approx. 8 hours; on Saturday, 25th May, 2024.
Venue:-
Sri Maharaj's Hall,
Draupadi Building, Sirvodem,
Margao, Goa.
The Schedule of the Satsang:
Puja:- 8.45 am to 9.00 am
Aarti:- 9.00 am to 9.30 am
Naam Japa/ Chanting:- 9.30 am to 5.30 pm. ( 8 hours continuous)
After this there will be a pravachan reading and Spiritual discussion / Shares session followed by dinner prasad.
1. There is a provision for Breakfast with Tea Prasad, Lunch Prasad, Afternoon tea Prasad , and Dinner prasad for all of the
Devotees present during Satsang.
2. The Hall is fully air-conditioned, Devotees may carry a shawl, sweater, etc. if they feel necessary.
3. Devotees can come for the Satsang anytime as per their convenience but are requested to ensure that while entering and leaving the Satsang Hall, other devotees' sadhana is not disturbed.
4.You may bring your own Japamala if you feel it necessary.
Special notice:-
SriNitinDada may or may not be physically present in the Satsang
Jai SriRam 🙏
जय श्रीराम
🙏
नाम जप/संकीर्तन सत्संग
आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,
श्रीब्रम्हचैत्यन्य महाराज
आणि आमचे प्रिय सद्गुरु
श्रीनितीनदादायांच्या कृपेने
शनिवार, दिनांक २५ मे, २०२४ रोजी सलग आठ तासासाठी नामजप/संकीर्तन सत्संग आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ:
श्रीमहाराजांचे सभागृह,
द्रौपदी बिल्डिंग, शिरवडे
- मडगाव, गोवा
सत्संगाचे वेळापत्रक:-
पूजा : - सकाळी ८. ४५ - ९.००
आरती :- सकाळी ९.०० - ९.३०
नाम जप/ संकीर्तन:- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३०
त्यानंतर, प्रवचनवाचन होईल आणि पारमार्थिक चर्चा आणि श्रीमहाराजांच्या कृपेचे शेअर्स सांगितले जातील. शेवटी रात्रीचा भोजन प्रसाद दिला जाईल.
१ . या दिवशी सकाळचा नाश्ता आणि चहा प्रसाद, दुपारचा भोजन प्रसाद, त्यानंतर संध्याकाळी चहा प्रसाद आणि रात्रीचा जेवण प्रसाद यांचं सर्व उपस्थित भाविकांसाठी आयोजन केलेलं आहे.
२. हॉल पूर्णपणे वातानुकूलित आहे. भाविकांना विनंती आहे की गरज भासल्यास आपली शाल,स्वेटर इ. त्यांनी सोबत आणावी.
३. भाविक कोणत्याही सोयीस्कर वेळी सत्संगात सामील होऊ शकतात. फक्त सत्संगहॉलमध्ये येताना किंवा जाताना, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
४. आपणास आवश्यक भासल्यास आपली जपमाळ सोबत घेऊन यावी.
विशेष सूचना:-
सत्संगात श्रीनितीनदादा हे प्रत्यक्ष हजर असतीलच असे नाही.
जय श्रीराम
🙏
JAI SRIRAM
🙏
Would you like to receive browser notifications from this website?
🙏
JAI SRIRAM