जय श्रीराम दादा.
लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदाच ८ जूनला मी कामानिमित्त ऑफिसमध्ये आले आणि पहिलं लॅपटॉप जागेवर आहे का ते चेक केले कारण लाॅकडाऊनमध्ये तो ऑफिस मध्येच राहिलेला.
पण दादांच्या कृपेने सुखरूप होता. मी खुषीत होते की आज आपले काम होणार शांतपणे कारण ऑफिस मध्ये कोणीही नव्हते. लॅपटॉप चालू केला तर लायसेन्स संपल्यामुळे फाईलमध्ये काहीही बदल करू शकत नव्हते. मी आमच्या आय.टी. च्या मुलाला फोन केला. तो म्हणाला की लायसेन्स संपल्यामुळे रिन्यू करावे लागेल. म्हणजे आज काही काम होणार नाही अशी पुसटशी शंका यायला लागली. पण मग म्हटलं दादा आपल्या सोबत आहेत. ते नक्की ह्यातून मार्ग काढणार आणि तसेच झाले.
माझा एक ऑफिसचा कलीगही आलेला मला अचानक दिसला. तो ऑफिसला येणार होता हे मला जरासुद्धा माहित नव्हतं. तो दिसल्यावर मी त्याला काय प्रॉब्लेम झाला ते सांगितलं आणि तो म्हणाला की एवढंच ना मला सांगा ना मॅडम, मी तुमचा प्रॉब्लेम सोडवतो. त्याच्याकडे त्याचा जुना लॅपटॉप होता. तो त्याने दिल्याने मी काम पुर्ण करु शकले. अक्षरशः दादाच होते त्याच्या रुपात माझ्या मदतीला आलेले. दादांनी पुन्हा एकदा सोबत असल्याची जाणीव करून दिली.
खरंच ह्या दिवस भराच्या अनुभवातून दादांनी एक शिकवण मात्र नक्की दिली आणि ती म्हणजे "तू सतत नाम घे / अनुसंधान ठेव मग मी तुझ्याबरोबर आहे." दादांनी एकदा का आपल्या लेकरांचा हात धरला की ते कायम त्यांच्या सोबत असतात. प्रत्येक संकटात आपल्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातात.
दादा मला जास्तीत जास्त नामाच्या स्मरणात रहाण्याची बुद्धी द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना .
माझ्या सद्गगुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम.
जय श्रीराम
23-06-2020 12:07 am / POSTED BY : Vaishali Sandeep Sadhale / Where the Experience took place : ८ जून २०२०, गोरेगाव, मुंबई .