जय श्रीराम
नितीनदादांना माझा प्रेमाचा नमस्कार.
मला दादांचे पहिल्यांदा दर्शन अमेरिकेत असताना २००५ जानेवारीत झाले, पण त्याआधीच दादांनी त्यांचे माझ्यावर पूर्ण लक्ष आहे हे दाखवून दिले होते असा हा अनुभव .
नोव्हेंबर २००४ - अभिजीत (नवरा) त्यावेळी अमेरिकेत होता. मैथिलीच्या (मुलगी) जन्मानंतर मी आणि मैथिली, आमचे अमेरिकेला जायचे ठरले. अभिजीत नुकताच इंडियात येऊन गेला असल्याने आम्हाला घ्यायला परत इंडियात येणे त्याला शक्य नव्हते. मी तर यापूर्वी कधीही विमान प्रवास केलेला नव्हता त्यामुळे त्याबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती आणि त्यात पुन्हा चार महिन्याच्या बाळाला घेऊन एवढ्या दूरचा प्रवास ! मी तर खूप घाबरले होते. अभिजीतने आम्हाला सोबत मिळावी म्हणून त्याच्या ऑफिस मधून कुणी येणार असेल तर चौकशी केली.
त्याचे एक सिनियर अश्विन देसाई हे त्याच दरम्यान ऑफिस च्या कामाने इंडियात आलेले होते. त्यांच्या ऑफिसच्या client ची team (अमेरिकन लोकांची) इंडिया ऑफिसला visit करणार होती म्हणून अश्विन पुढे आले होते. अभिजीतने त्यांना आम्हाला सोबत आणण्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले कि client team माझ्यासोबत प्रवास करणार असेल तर मी काही मदत करू शकणार नाही, पण ते नसतील तर मी नक्कीच दोघींना सोबत घेऊन येईल. अभिजीतला त्यांनी contact मध्ये रहा असे सांगितले.
दादांनी अशी काही बटणं दाबली की अमेरिकन टीमला इंडियाचा व्हिसा मिळाला नाही आणि त्यांची visit रद्द झाली, मग काय आमची तिकीटं बुक झाली. पुणे ते कनेक्टिकट या पूर्ण २०-२२ तासांच्या प्रवासात कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही. विमान प्रवासात कानाला दडे बसल्यामुळे लहान मुले खूप रडतात, त्रास देतात अस ऐकून होते पण ४ महिन्यांची मैथिली पूर्ण प्रवास झोपून होती. तिच्याबाबतीतही बटण दाबलं होतं अशी ती शांत होती . विमानात आजूबाजूचे seats पण रिकाम्या ठेवल्या होत्या ज्यामुळे अगदी आडवे झोपून आम्ही आलो. अधून मधून अश्विन मला काय हवं नको ते पण विचारायचे.
माझ्या बॅग्स उचलण्यापासून ते immigration form भरेपर्यंत सगळी मदत अश्विननीच केली. दादांनी मला अगदी आल्हाद अमेरिकेत पोहोचवलं होतं. नंतर अभिजीतच्या office मध्ये सगळे गमतीत म्हणायचे (हिंदीत) की "अश्विन तो कुलकर्णी कि wife को लेने के लिये india गया था ".
अक्षरशः १००% खरं होत ते. दादांनीच अश्विनना माझ्यासाठी पाठवलं होतं. दादांनी मला जी प्रवासाची काळजी होती ती पूर्णपणे स्वतःकडे घेतली होती. मला दाखवून दिलं कि त्यांचं पूर्ण लक्ष आहे माझ्यावर. दादांनी ठरवल्यावर मग मदत करायला ते माणसं कशी उभी करतात याचा अनुभव दिला. अमेरिकेला जाण्यापूर्वी २००४ मध्ये दादांशी इंडियात फोनवर बोलणे झाले होते तेव्हा दादा म्हणाले होते "भेटू आपण" पण तेव्हा दादांबद्दल अजिबात कल्पना नव्हती (तशी अजूनही नाही).
त्यावेळी जर अभिजीत आम्हाला घ्यायला आला असता तर कदाचित अभिजीतचा आधार वाटला असता पण नेहमी लक्षात राहील असा हा अनुभव मिळाला नसता, त्यामुळे दादांचा plan आपल्याला समजणे कठीण. मला दादांचे दर्शन होणार ती वेळ जवळ आली होती. पुढे त्यांच्याच इच्छेने जानेवारी २००५ मध्ये पाहिल्यांदा दर्शन मिळाले. त्यानंतर दादांनी प्रेमाचा आणि अनुभवांचा वर्षावच सुरु केला जो की अजूनही चालूच आहे.
THANK YOU DADA
सत्गुरुनाथ महाराज की जय.
जय श्रीराम
10-06-2020 12:43 am / POSTED BY : Pallavi Kulkarni / Where the Experience took place : इंडिया ते अमेरिका