Jai SriRam
मे २४, २०२०
करोना व्हायरस लाॅकडाउनच्या निमित्ताने इकडे गेले दोन महीने आमचे झुमवरुन व्हर्च्युअल सत्संग होत होते. झुमवरील बॅनमुळे मे २४ चा सत्संग कॅन्सल करायचे ठरले.
त्यादीवशी सकाळी माझे व इंदीराचे बोलणे झाले. बोलता बोलता गुगल मिटचा उल्लेख झाला. मी लाॅग इन केले. मिटींग कशी होते ते बघु लागले. मेसेजेस पाठवुन हळु हळु ग्रुपवरील लोकांना आमंत्रण धाडली. ज्यांना जमणार होते त्यांच्याबरोबर टेस्ट मिटींग केली.
आमचा त्या दीवशीचा सत्संग झाला!
हे सर्व माझ्या मते माझ्या अवाक्या बाहेरचे होते. कुठुन आले इतके बळ?
माझ्याकडून हे सर्व इतक्या कमीवेळात तसेच शिस्तबद्ध प्रकारे करवुन घेणारा माझ्या नितीनदादा शिवाय अजुन कोण असणार?
मी नाही तर अजुन कोणा द्वारे हे झालेच असते.
त्याच्या काही वर्षांपूर्वीच्या मेसेजमधील एक वाक्य आठवले.
“Never underestimate your own strength as HE resides within you.”
माझी श्रद्धा आहे की नितीनदादा सतत माझ्याजवळ असतोच. तोच कर्ता व करविता आहे. परंतु असे अनुभव देउन तो माझ्यामध्येही वास करुन असल्याची वारंवार जाणीव करवुन देतो.
Thank you Nitindada!
Jai SriRam
02-06-2020 03:40 am / POSTED BY : Aparna Walawalkar / Where the Experience took place : कनेक्टीकट, अमेरिका