जय श्रीराम
आज सकाळी कोणीतरी हाऊसिंग सोसायटीच्या व्हाट्स-ॲप ग्रूप वर रमजान ईद बद्दल शुभेच्छा देणारी एक इमेज पोस्ट केली, त्यावर श्री. तुकाराम महाराजांच्या अभंगातील खालिल ओळी होत्या.
अल्ला देवे अल्ला दिलावे Iअल्ला दारु अल्ला खिलावे ।I अल्ला बगर नही कोये I अल्ला करे सो हि होये II
मी या अभंगाबद्दल या आधी कधी ऐकले/वाचले नव्हते म्हणून हा अभंग इंटरनेट वर शोधला आणि ह्यात तुकाराम महाराजांनी भगवंताला अल्ला या नावाने संबोधल्याचे पाहून मला पुढिल शेअर ची आठवण झाली.
नितीनदादा व आम्ही सगळी भक्त मंडळी सत्संगासाठी अमेरिकेत ट्विंसबर्ग, ओहायो या ठिकाणी जमलो होतो. तिथे दादाला भेटण्यासाठी म्हणून एक मुस्लिम दांपत्य आले. ते दांपत्य मुळचे तुर्कस्थानचे रहाणारे होते व पेशाने दोघेही डॉक्टर होते. ते बसले असतानाच अजुन एक भक्त सत्संगासाठी म्हणून तिथे आला व त्याने दादाला साष्टांग नमस्कार करुन दर्शन घेतले. हा नमस्काराचा प्रकार तिथे बसलेल्या डॉक्टर दांपत्यासाठी नवीन/विशेष होता. दादाला केलेला साष्टांग नमस्कार बघुन त्या बाईंनी दादाला विचारले की तुम्ही आला आहात म्हणून ईतकी मंडळी ईथे जमली आहे व हे सगळे आपल्याला साष्टांग नमस्कार करत आहेत तर आपण नक्कीच कोणीतरी स्पेशल आहात, आपण संत आहात का? यावर दादा हसला पण त्या बाईंच्या प्रश्नाचे डायरेक्ट उत्तर दिले नाही. परमार्थाबद्दल त्यांच्याशी बोलताना दादानी सांगीतले की परमार्थाचे मर्म म्हणजे प्रेमाने भगवंताचे स्मरण करणे हे होय. दादा पुढे म्हणाला की त्या बाईंनी श्री अल्ला जय अल्ला जय जय अल्ला असे म्हणून जरी भगवंताचे स्मरण केले तरी त्याला ते चालेल. हे सांगताना दादानी भगवंताला/श्रीरामाला अल्ला असे संबोधले. तीच गोष्ट आज तुकाराम महाराजांच्या अभंगात पहायला मिळाली.
खरोखर सगळे संत सारखेच, देव एकच आहे आणि परमार्थ हा सर्व धर्मांच्या वरती व श्रेष्ठ आहे. पुढे बोलणे चालू असताना त्या बाई अचानक दादाला म्हणाल्या की दादानी त्यांना त्यांच्या पूर्व-जन्मीच्या कुठल्यातरी एका गोष्टीची आठवण करुन दिली. हे ऐकून आम्हाला खुप आश्चर्य व कुतुहल वाटले. दादा हसला व म्हणाला हा सहवासाचा (दादाच्या फिजीकल कम्पनीचा) परिणाम आहे. काही वेळानी ते दांपत्य गेल्यावर दादानी एक गोष्ट आम्हाला सांगितली ती अशी की ते दांपत्य धर्मानी मुस्लिम आहे व मुस्लिम धर्म पुनर्जन्म मानत नाही, असे असताना सुद्धा त्या बाईंना त्यांच्या पूर्वजन्मीची आठवण दादानी करुन दिली व त्यांनी ती मोकळ्या मनाने मान्य केली. माझ्यासाठी, त्या बाईंनी दादाला विचारलेल्या - आपण संत आहात का या प्रश्नाचे दादानी त्यांना हा अलौकिक अनुभव देऊन दिलेले उत्तर होते. सद्गुरूनाथ महाराज की जय!
जय श्रीराम
25-05-2020 09:34 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ट्विंसबर्ग, ओहायो, अमेरिका