जय श्री राम
ही गोष्ट साधारण सप्टेंबर २०१७ची आहे. मी, विशाल (माझे पती) आणि अभिजीत दादा (आत्ये भाऊ) असे तिघे नितीनदादांच्या दर्शनाला त्यांच्या पुण्यातल्या घरी गेलो होतो. त्या काळी माझा मुलगा आर्यन हा अत्यंत hyper होता. आम्ही या विषयावरच बोलायला त्यांच्या कडे गेलो होतो. गेल्या वर आम्हाला आलेला अनुभव खुपच अविस्मरणीय होता.
आम्ही गेलो आणि बरोबर दिलेल्या वेळेवर दादा हॉल मधे आले. मी आणि विशाल खाली बसलो होतो. दादांना आल्यावर आम्ही वाकुन नमस्कार केला. मी जशी वाकले तसा मला एक खुपच सुंदर सुगंध आला. तो सुगंध अनुभवायची पहिलीच वेळ असल्याने माझ्या मनात आले, वा, दादांनी किती सुंदर पावडर लावली आहे. ठाउक नव्हते ना की हा सुगंध पावडरचा नसून दादांचा स्वत:चा आहे. नंतर दादांनी आम्हाला वर सोफ्यावर बसा म्हणून म्हंटले, आम्ही म्हंटले नको दादांच्या चरणाशी बसावे, आणि आम्ही खालीच बसलो राहिलो. ते पाहुन दादा देखील आमच्या सोबत खाली बसले. नंतर आमचे बोलणे झाले व आम्ही निघालो. दादा आम्हाला निघताना म्हणाले संध्याकाळी सत्संगला याल ना तेव्हा मी आर्यन साठी तिर्थ देईन. आम्हाला तर खूप आनंद झाला ते ऐकुन. संध्याकाळी सत्संगानंतर दादांनी सांगितल्या प्रमाणे आम्हाला आर्यन साठी तिर्थ दिले. आणि एक दोन दिवसातच दादा गोव्याला निघुन गेले.
दादा गेल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला निरोप आला की आर्यनसाठी अजुन तिर्थ आहे, घेउन जा. आणि आभिजीत दादाच्या हातून ते तिर्थ आमच्या पर्यंत पोहोचले सुद्धा. तिर्थाला सुद्धा एक सुगंध होता...आम्ही तिर्थ देणे सुरु केले होते. अचानक एक दिवस मला त्या तीर्थामधे पांढरे fungus सारखे काही दिसले. आता मनात प्रश्न आला द्यावे की नाही द्यावे. इंदिराजींना मेसेज करून त्याबद्दल विचारले. थोड्या वेळाताच दादांनी इंदिराजींच्या मोबाईल वरुन रिप्लाय केला - "If there is No trust, throw it." आई ग! ...... दादांच्या कृपेने लक्षात आले ... चुकले आपले.... लगेच चुक सुधारायची ठरवून उरलेले तिर्थ आर्यनला देणे सुरु केले. त्या तिर्थाचा परिणाम, आर्यन आता बऱ्यापैकी शांत झालाय. आर्यनवर दादांचे किती प्रेम आहे हे वेळोवेळी दिसत आले आहे. दादा प्रत्येक वेळी त्याचा आत्मविश्वास वाढवा म्हणून काही ना काही करत असतात.
दादांकडे वक्तशीरपणा, लीनता, आणि महत्वाचे म्हणजे परमेश्वरा वरचा विश्वास ह्या तीन गोष्टी ठळकपणे दिसल्या.
..... भगवंतावरच्या विश्वास/श्रद्धेवाचून सगळा परमार्थ लटका आहे.
खुप खुप धन्यवाद दादा.
जय श्री राम
23-09-2020 11:40 am / POSTED BY : Shraddha Kapse / Where the Experience took place : पुणे