जय श्रीराम
प्रसंग क्र १
फेब्रुवारी महिन्यात माझा गाडीचा एक छोटा अपघात झाला. झाले असे कि, माझ्या ऑफिसमध्ये कंपनीचे सेक्युरिटी गार्ड कार पार्क करतात कारण पार्किंग स्पेस फार कमी आहे आणि त्यांना गाड्या दिवसभरात बऱ्याच वेळेला पुढे मागे कराव्या लागतात. म्हणुन मी कार ची किल्ली सेक्युरिटी गार्डला दिली आणि ऑफिस मध्ये काम सुरु केले.
साधारणपणे ४ वाजेच्या सुमारास मी कॅफेटेरिया मध्ये बसलो असताना तो सेक्युरिटी गार्ड माझा कडे आला आणि मला पार्किंग मध्ये बोलावले. मी बाहेर गेल्यावर मला कळले कि त्याने माझी गाडी ठोकली आहे कारण त्याला रिव्हर्स गियर टाकताना अंदाज आला नाही. गाडीचे मोठे नुकसान झाले होते. पार्किंग सेन्सर, रिअर कॅमेरा, लॅम्प, ट्रंक चे दार सगळे तुटले होते.
अशा परिस्थितीत पण दादांनी माझे डोके शांतं ठेवले. सेक्युरिटी गार्ड मला म्हंटला कि "सर ऑफिस में मत बताना मैं थोडा थोडा करके पैसा दे दूंगा आप कितना नुकसान हुआ हैं बताईये " दादांनीच बुद्धी दिली आणि मी त्याला दिलासा देवून सांगितले कि "कोई बात नही, होता हैंI आपको पैसा देनेकी जरुरत नही हैं". दादांनी या अनुभवातून हे शिकवले कि, जे घडले ती दादांनी इच्छा समजून जर का परिस्थतीला सामोरे गेले तर मनाचे समाधान बिघडत नाही.
प्रसंग क्र २
वरील अपघातानंतर कार मेकॅनिक कडे द्यायला मला वेळ मिळाला नाही कारण मला लगेच ४ आठवड्यान करीता परदेशी जावे लागले आणि भारतात परत आल्यावर लोकडाऊन लागला. लोकडाऊनची बंधनं शिथील झाल्यावर मी गाडी दुरुस्तीला टाकायला गेलो असता, तिथला इन्शुरन्स अधिकाऱ्यांनी मला सुचवले कि अपघातची तारीख फेब्रुवारीची न टाकता मागच्या आठवड्यातली टाका म्हणजे तुमचे इन्शुरन्स क्लेम लवकर अँप्रूव्ह होईल कारण जर क्लेम रिजेक्ट झाला तर तुम्हाला ४५-५० हजाराचा फटका आहे. पुजा (माझी पत्नी) आणि मी ठरवले होते कि खोटे सांगायचे नाही कारण अश्या गोष्टी दादा अँप्रूव्ह करणार नाही म्हणून खरी ती तारीख टाकुया. आम्ही खरी ती तारीख टाकली आणि पूर्ण ४६ हजाराचा क्लेम इन्शुरन्स कंपनीने अप्रूव्ह केला.
या घटनेतून दादांनी हे शिकविले कि, जर तुम्ही त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललात तर ते नक्कीच मदत करतात आणि त्यांची उपस्थिती दाखवतात. इथे प्रश्न पैशांचा नसुन त्यांनी सांगितलेल्या तत्वांवर चालायचा प्रयत्न करायचा आहे. जर तो क्लेम रिजेक्ट जरी झाला तरी ती सुद्धा त्यांची कृपाच आहे हे मी जाणले पाहिजे.
जय श्रीराम
12-09-2020 02:38 pm / POSTED BY : Ankur kulkarni / Where the Experience took place : Pune, India