जय श्रीराम
सद्गुरू श्री नितिन दादांच्या चरणी सादर प्रणाम.
दिनांक ११ मे २०२० रोजी आम्ही पुण्याहून मुंबई मध्ये आलो आणि दोन - तीन दिवसातच असे कळले की covid १९ साठी मला ड्युटी लावली आहे. मला ऑफिस मध्ये बोलवून घेतले व सांगितले की तुम्हाला तुमच्या ड्युटी चे details whatsapp वर दिले जातील. मला मागच्याच वर्षी स्वाईन फ्लू झाला होता व थोडा ब्रॉन्कायटिसचा ही त्रास आहे. मे महिन्याचा शेवटी माझा मुलगा ओंकार ह्याच्या मैत्रिणीच्या आई वडिलांना corona झाला व त्यातच तिच्या आईचे निधन झाले, ह्या सगळ्यामुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माझी पत्नी मनीषा खुपच धास्तावून गेली होती. पण ड्युटी ला जाणे ही गरजेचे होते नाहीतर suspention च्या orders दिल्या जाणार होत्या. घरात भीतीचे वातावरण व ड्युटी कधीही येऊ शकते ह्याची टांगती तलवार, ह्यामध्ये माझी पत्नी मनीषा हिने दादांना message करून माझ्या ड्युटीबद्दल व मला असलेल्या शारीरिक त्रासाबद्दल सांगितले. त्यावर दादांनी तिला आपल्याला जे कर्तव्य करणं जरूर आहे ते करावं. योग्य ती काळजी घावी. व नाम कमी पडू देऊ नका असे सांगितले. दादांची एवढी कृपा की माझी ड्युटी २२-२५ दिवसांनी पुढे ढकलली गेली व ८ जून रोजी मला ड्युटीचा कॉल आला. त्यात असे कळले की मला night shift दिली आहे आणि तीही covid वॉर-रूममध्ये म्हणजेच जिकडे करोन बधितांचा प्रत्यक्ष संपर्क येणार नाही अश्या ठिकाणी. ह्यावरून दादांची प्रचंड कृपा आहे हे जाणवले.
मागच्या वर्षी दादा बोरिवलीच्या घरी आले असता त्यांची पाद्यपूजा करण्याची संधी लाभली. दादांच्या चरणांचेे तीर्थ मनीषाने देव्हाऱ्यात ठेवले आहे व ते ती मला रोज ड्युटीला जाण्याआधी देत असे व मी 'दादा, बरोबर चला' अशी विनंती करत असे. दादा बरोबर आल्यामुळे परिस्थिती गंभीर असून देखील त्यांच्याच कृपेने मन शांत होते व अशा रीतीने दादांनी १८ दिवसांची ड्युटी माझ्याकडून पूर्ण करवून घेतली.
ह्यावरून श्रीगुरु सारखा असता पाठीराखा ह्या ओवीचा प्रत्यय आला.
Thank you so much दादा
जय श्रीराम
01-07-2020 10:45 pm / POSTED BY : Uday Agniohotri / Where the Experience took place : मुंबई