जय श्री राम दादा
साष्टांग नमस्कार.
ह्या लॉकडाउनमध्ये बऱ्याच जणाना (नातेवाईक/नवरा) दादांचे वेगवेगळया कारणानी मेसेज /फोन येत होते. माझ्याही मनात सुप्त इच्छा होती कि मलाही दादांचा फोने किंवा मेसेज यावा. जेव्हा दादांनी शेअर ग्रुप केला तेव्हा मी त्याचा रिंगटोन वेगळा ठेवला त्याचबरोबर दादांच्या कॉलसाठी वेगळा रिंगटोन ठेवला.आता माझ्या इच्छेचं रूपांतर अपेक्षेत झाल होतं. शेवटचे दोन मेसेज दादांना पाठवले तेव्हा मी कितीही वर वर नाही म्हटलं तरी रिप्लाय येणार अशी अपेक्षा कुठेतरी होती.
२८ जून २०२०
संध्याकाळी रामनाम धून वर जप चालू होता. शेवटची १५ ते २० मिनिट बाकी होती आणि आतून आवाज आला, "तुला नाही येणार फोन" त्याच क्षणी खूप वाईट वाटलं आणि मनात सेल्फ-पिटीवाले विचार यायला लागले. पण दुसऱ्याच क्षणी दादांच्याच कृपेनं त्यांचच दुसरं एक वाक्य आठवलं "There is No self-pity especially in Parmartha". मग कल्पीताने लिहिलेला एक शेअर आठवला. त्यातलं दादांचं अजून एक वाक्य आठवल "किती ही अपेक्षा". आपली चूक समजली. दादांच्या चार कार्डिनल रुलपैकी एक मोडला गेला होता. चूक समजल्या नंतर त्यांच्याच कृपेने मन शांत झालं. मी डोळे उघडले जप संपायला ५ मिनिट बाकी होती. जप संपल्यावर कस्टम नोटिफिकेशन चेन्ज करून रेगुलर रिंगटोन ठेवला.
Thank YOU so much DADA.
जय श्री राम
28-06-2020 10:09 pm / POSTED BY : Manisha Shetgaonkar / Where the Experience took place : Margao, Goa